Bus with Seepz employees on Rajgad Fort Trek plunges in Pabe Ghat Two Mumbai residents dies Crime News; राजगड किल्ल्यावर जाताना पाबे घाटात बस 40 फूट खोल दरीत, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढलं, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
Bus with Seepz employees on Rajgad Fort Trek plunges in Pabe Ghat Two Mumbai residents dies Crime News; राजगड किल्ल्यावर जाताना पाबे घाटात बस 40 फूट खोल दरीत, काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढलं, मुंबईकर तरुण-तरुणीचा मृत्यू
SEEPZ Employee Bus Accident : घाटामध्ये एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस सुमारे ४० फूट दरीत कोसळून एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना घडली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, मुंबई : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस संरक्षक कठडा तोडून सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात मुंबईतील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चालकासह १८ जण किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात राजगड तालुक्यातील पाबे घाटातील एका वळणावर रविवारी मध्यरात्री १ वाजता घडला.
दोघांचा मृत्यू, नऊ महिला जखमी
विश्वास बाबूराव सातिम (२५, रा. नेहरू नगर, विलेपार्ले) आणि ध्वनी चंद्रेश ठक्कर (२३ रा. ओम पॅलेस, कांदिवली) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये नऊ महिलांचा समावेश असून, जखमींवर वेल्हे ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जखमी अंधेरी, नालासोपारा, चुनाभट्टी, मानखुर्द, भांडुप, विलेपार्ले, डोंबिवली, विरार, गावदेवी, जोगेश्वरी, संतोष नगर, महात्मा गांधी नगर येथील रहिवासी आहेत. Mumbai Muharram Poison Plot : पत्नी सोडून गेली, समाजाबद्दल द्वेष; फय्याज 15000 मुंबईकरांच्या जीवावर उठला, सलमानच्या सतर्कतेने अनर्थ टळला या प्रकरणी गिरीश रवींद्र जंगम (२८, रा. शिवटेकडी, जोगेश्वरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेल्हे पोलिस ठाण्यात संदीप तुकाराम गायकवाड (४७, आंबेडकर नगर, एमआयडीसी रोड, अंधेरी पूर्व) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ फुटीर खासदार मिंधेकडे गेले, भाजपात का नाही गेले? ठाकरेंनी सांगितलं ‘ऑपरेशन देवेंद्र’
बस कोसळताना उलटल्याने सर्व प्रवासी सीट खाली अडकले. फिर्यादीने ११२ क्रमांकावर फोन केला. खबर मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी क्रेन आणल्यानंतर रात्री अंधारात बचावकार्य सुरू करण्यात आले. बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आणि वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी विश्वास सातिम आणि ध्वनी ठक्कर यांना मृत घोषित केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा