Headlines

Gold Silver Price Crash 29 August 2026; सुवर्णकाळ संपला? अमेरिकेतून बातमी येताच सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीचे दरही गडगडले; गुंतवणूकदारांची पळापळ


Gold Price Crash: गेल्या महिन्याभरापासून तेजीच्या रथावर स्वार सोन्याच्या दरांना अचानक 29 रोजी उतरती कळा लागली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या एका भाषणामुळे जगभरातील बाजारांमध्ये खळबळ उडाली आहे. शुक्रवारी वायोमिंगमधील जॅक्सन होल येथे फेडच्या वार्षिक परिषदेत बोलताना वॉर्श यांनी महागाई कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचा स्पष्ट इशारा दिला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्षांचे भाषण आणि अमेरिकेच्या नॉन-फार्म पेरोल्सच्या आकडेवारीतील किरकोळ घट यांमुळे, शुक्रवारी (28 ऑगस्ट) सोन्याच्या दरांनी यापूर्वी मिळवलेला नफा गमावला आणि 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. फेड अध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महागाई पुरेशा गतीने 2% लक्ष्य गाठू शकली नाही, तर फेडरल रिझर्व्हला ‘ॲक्शन घ्यावी लागेल,’ ज्याचा थेट अर्थ व्याजदरात वाढ करणे असा होतो. मे महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून वॉर्श यांनी पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले असून व्याजदर फेडचे ‘मुख्य शस्त्र’ असल्यावर जोर दिला. वॉर्श म्हणाले,

Maharashtra TimesShare Market: CAS चा पायगुण, मुंबई शेअर बाजारात खळबळ; 5 मिनिटांत कमावले 44 लाख रुपये, ट्रेडर्सही चक्रावले

“या उन्हाळ्यातील PCE आणि सीपीआय आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली होती, पण यामधून मूळ प्रवृत्तींमध्ये कोणतीही लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. महागाई नियंत्रणात ठेवण्याचे आमचे पहिले ध्येय आहे.”

अमेरिकेतील उच्च महागाईचा सामना करण्यासाठी मध्यवर्ती बँक व्याजदरात वाढ करू शकते, असे संकेत वॉर्श यांनी आपल्या भाषणात दिले.विशेष म्हणजे अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने दीर्घकालीन रोख्यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला होता आणि मंगळवारी (25 ऑगस्ट) या मौल्यवान धातूने तीन महिन्यांतील उच्चांक गाठला, पण त्यानंतर, सतत घसरणीचा दबाव कायम राहिला.

Maharashtra TimesUS Oil Deal : अखेर ट्रम्पनी हवं तेच केलं; इराण युद्धात दादागिरी करून 65 अब्ज बॅरल तेल हिसकावले

सोन्याच्या किमती धडाम

फेड अध्यक्षांच्या विधानानंतर केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नव्हे तर भारतीय बाजारातही सोन्याच्या दरांमध्ये घट नोंदवली गेली. MCX वर सोन्याचा वायदा 2700 रुपयांनी किंवा 1.73 टक्क्यांनी घसरले आणि 1,56,250 रुपयांवर कमी आले. तसेच चांदीच्या फ्युचर्स किमती 1.64% किंवा 3900 रुपयांनी घसरून 2,36,700 लाखांवर कमी झाले आहेत.

आपल्या भाषणादरम्यान फेडच्या प्रमुखांनी अमेरिकेतील महागाई अजूनही खूप जास्त असल्याचे मान्य केले आणि मध्यवर्ती बँकेला पावले उचलावी लागू शकतात, असे संकेत दिले. फेडकडून व्याजदरात वाढ केली जाऊ शकते, असे संकेत देणारे फेड अध्यक्षांनी प्रथमच विधान केले. “मूलभूत महागाई स्पष्ट आणि पुरेशा वेगाने उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल करत आहे, याबद्दल आपल्याला खात्री केली पाहिजे. अन्यथा आपल्याला अजून काम करावे लागेल,” असे वॉर्श यांनी नमूद केले.

अमेरिकेत व्याजदर वाढीचा सोने-चांदीवरील परिणाम

केविन वॉर्श यांच्या या विधानांचा परिणाम केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरातील बाजारांवर होईल. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती कमी होऊ शकतात. गुंतवणूकदार डॉलर आणि बॉण्ड्सकडे वळतील, ज्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंचे तेज कमी होण्याची शक्यता आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत