SIR Form In Xerox Shop: ‘एसआयआर’चे अर्ज झेरॉक्सच्या दुकानात सापडल्याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाने पाच ‘बीएलओं’चे निलंबन करण्यात आले.

खारघर सेक्टर-१९मधील एका झेरॉक्स दुकानात निवडणूक आयोगाच्या हजारो गोपनीय एसआयआर अर्जांच्या दुय्यम प्रती काढण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी तिथे भेट दिली. त्यावेळी भाजपचा स्थानिक पदाधिकारी सूरज पाटील हा मतदारांच्या हजारो मूळ अर्जांच्या प्रती काढताना आढळला. यावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन तणाव निर्माण झाला. खारघर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सूरज पाटील याला ताब्यात घेतले आणि ३,४०४ अर्ज जप्त केले. त्यानंतर काही वेळातच सूरज पाटील हा संशयास्पदरीत्या पोलिस ठाण्यातून फरार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे पदाधिकारी बालेश भोजने यांनी केला. त्यावरून ‘उबाठा’च्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.
Nepal Flood : मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? नेपाळमध्ये बेपत्ता जीवलगांच्या कुटुंबांची घालमेल, मुंबई-पुण्यातील ग्रुप संपर्काबाहेरदरम्यान पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांच्या आदेशानुसार, नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्यासह महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने जप्त केलेल्या अर्जांची तपासणी केली. ते १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मूळ अर्ज असल्याचे निष्पन्न झाले. या अर्जांवर मतदारांचे मूळ रंगीत फोटो, भरलेले तपशील आणि संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आढळून आल्या.
याशिवाय निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह आणि एसआयआर लिहिलेल्या कापडी पिशव्या आढळून आल्याने महसूल विभागाच्या पथकाने सर्व अर्ज आणि साहित्य जप्त केले. त्यानंतर नायब तहसीलदार सुनील जाधव यांनी सूरज पाटील याच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात शासकीय गोपनीय दस्तावेजांची अनधिकृत हाताळणी करणे, त्यांची छायांकित प्रत काढणे आणि मतदारांच्या डेटाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ – कलम ३१४ लोकप्रतिनिधित्व अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Devendra Fadnavis: प्रसादाची शुद्धता जपा, FDA नियमांचं पालन करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे गणेश मंडळांना निर्देशया प्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाने पाच ‘बीएलओं’चे निलंबन करण्यात आले. राहुल भगत, योगेश केणी, उमेश मढवी, प्रशांत म्हात्रे आदी चार जणांसह आणखी एक राहुल भगत नामक बीएलओंचा यात समावेश आहे. हे पाचही बीएलओ पनवेल महापालिकेतील कर्मचारी असल्याचे समजते.
गोपनीय दस्तावेज कार्यकर्त्याकडे कसे ?
निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अत्यंत संवेदनशील असणारे मतदारांचे मूळ गोपनीय मूळ अर्ज थेट एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या हातात कसे पोहोचले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मतदारांच्या खासगी माहितीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होता का, यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास खारघर पोलिस करत आहेत.

