पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत मात्र त्याचे पडसाद आत्ताच आपल्या राज्यात पाहायला मिळत आहेत. राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी शिंदेंची शिवसेना आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. मात्र काल राज्यात राजकारणात काही वेगळच घडलं. प्रताप सरनाईक यांच्या मंत्रालयाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवला आणि अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आता एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या काळात त्यांच्यावर मराठीवरून कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळेच परिवहनमंत्र्यांना विश्वासात न घेता काल हा निर्णय जाहीर केल्यानंतर, शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळं फडणवीसांच्या निर्णयामुळं अमराठी किंवा उत्तर भारतीयांना दिलासा मात्र मराठी भाषेला दुजाभाव का..? ‘सीएम’ला उत्तर भारतीयांचा पुळका कशासाठी आलाय असा सवाल उपस्थित होतोय. तेव्हा हे सगळं प्रकरण काय आहे, अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा देताना फडणवीसांनी कोणते महत्त्वाचं वक्तव्य केलंय, शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करताना कोणते मुद्दे मांडलेत आणि यावर आता राज्यातील मराठी एकीकरण समितीची काय भूमिका आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#DevendraFadnavis #PratapSarnaik #ShindeShivSena #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #MarathiLanguage #MarathiLanguageRule #AmarathiRickshawDrivers #AmarathiTaxiDrivers #MarathiCertificate #MaharashtraTransport #MarathiAsmita #MarathiSwabhiman #MarathiEkikaranSamiti #MumbaiNews #MaharashtraNews #MarathiNews #Mahayuti #ShivSenaBJPNext year, Uttar Pradesh goes to polls, but its political impact is already being felt in Maharashtra. The Shinde-led Shiv Sena and Transport Minister Pratap Sarnaik had pushed for strict Marathi language requirements for non-Marathi auto, taxi and app-based cab drivers. However, Chief Minister Devendra Fadnavis has now given them another one-year extension to learn Marathi, with no action during this period. The decision, reportedly taken without consulting Sarnaik, has sparked discussions of growing differences between the Shiv Sena and BJP. So, what exactly did Fadnavis say, why are Shiv Sena leaders unhappy, and what is the Marathi Ekikaran Samiti’s stand? Let’s find out.