Headlines

Neha Dhupia Proposed Karan Johar ; नेहा धुपियाने करण जोहरला 3 वेळा केलेलं प्रपोज, पण नकारासाठी दिलेलं भलतंच कारण


Neha Dhupia On Karan Johar : अभिनेत्री नेहा धुपियाने तिच्या नो फिल्टर विथ नेहा या शोमध्ये करण जोहरला लग्नाची मागणी घातल्याची कबुली दिली होती.

neha dhupia karan johr
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हिंदी चित्रपट अभिनेत्री नेहा धुपिया हिने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांच्या जगात आपली ओळख निर्माण केली होती. नंतर तिने टीव्ही व पॉडकास्ट होस्ट म्हणून स्वतःचे वेगळे स्थान मिळवले. तिचा ‘नो फिल्टर नेहा‘ हा शो खूप गाजला; यातील एका भागात तिने करण जोहरशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला होता. त्यात तिने दिग्दर्शकाला लग्नासाठी मागणी घालण्याबाबतची ती आठवण सांगितली होती.

नेहाचा सुरुवातीचा प्रवास

नेहा धुपियाचा जन्म 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील कोची येथे झाला होता. तिचे वडील भारतीय नौदलात अधिकारी असल्याने तिचे बालपण विविध ठिकाणी गेले; तिचे बहुतांस बालपण हे दिल्लीत गेले. तिने दिल्लीतील ‘जीझस अँड मेरी कॉलेज’मधून इतिहासात आपले शिक्षण पूर्ण केले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग आणि रंगभूमीवर काम केले, तसेच जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओंतही ती झळकली होती.

‘मिस इंडिया’ ते फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास

2002 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर नेहा जास्त प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर तिने ‘मिस युनिव्हर्स 2002’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि अंतिम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. तिच्या कारकिर्दीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला होता, यामुळेच भारतीय फिल्म इंडस्ट्रीची दारे तिच्यासाठी खुली झाली.

हिंदी फिल्म इंडस्ट्री व्यतिरिक्त नेहाने इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले. 2003 मध्ये ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2004 मधील ‘जुली’ या चित्रपटाने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने ‘क्या कूल हैं हम’ , ‘चुप चुप के’, ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ आणि ‘सिंग इज किंग’ यांसारख्या चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच, तिने ‘हिंदी मीडियम’ , ‘तुम्हारी सुलू’ , ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘अ थर्सडे’ यांसारख्या चित्रपटांतही काम केले आहे.

Maharashtra TimesHaryanvi Singer Ankit Baliyan : जिममधून बाहेर पडताच हरियाणाच्या प्रसिद्ध गायकाला जागीच संपवलं ; आई लेकाचं डोकं मांडीवर ठेवून बोलतेय- शूssss तो झोपलाय!
मात्र, नेहाने स्वतःला केवळ चित्रपटांपुरते मर्यादित ठेवले नाही. ती टेलिव्हिजनवरही सक्रिय राहिली आणि ‘रोडीज’ सारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शो मध्ये ती झळकली. याव्यतिरिक्त, तिने ‘स्टाइल्ड बाय नेहा’ सारख्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. ‘नो फिल्टर नेहा’ या शोद्वारे तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली; या शोमध्ये ती चित्रपटसृष्टीतील कलाकारांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, आवडीनिवडींबद्दल आणि अनुभवांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारायची.

करण जोहरला लग्नासाठी मागणी

याच शोदरम्यान करण जोहरशी संबंधित एक मजेशीर किस्सा समोर आला. एका मुलाखतीत नेहाने सांगितले की, तिने करण जोहरला वेगवेगळ्या ठिकाणी तीनदा गंमतीने लग्नासाठी मागणी घातली होती, पण त्याने प्रत्येक वेळी या प्रपोजलला नकार दिला. तिने नमूद केले की, करणने नकार देण्यासाठी अनेक कारणे दिली होती, ज्यापैकी एका कारणामुळे तिलाही हसू आले.

Maharashtra TimesKangana Ranaut On Baba Ramdev : ते माझ्या बेडरुममध्ये वटवाघुळासारखे लटकलेले का? कंगना रणौत अन् बाबा रामदेव यांची शाब्दिक चकमक
नेहा म्हणाली, “माझे प्रपोजल नाकारताना करणने दिलेल्या कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याला माझे शरीर आकर्षक वाटले नाही.”

नेहाने करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली ‘लस्ट स्टोरीज’ मध्ये काम केले. तसेच, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात तिने एका पत्रकाराच्या भूमिकेसाठी आपला आवाज दिला होता. नेहाने नंतर सांगितले की, तिने आपल्या पॉडकास्टसाठी करणला अनेकदा फोन केला होता आणि तिचा आवाज वारंवार ऐकल्यामुळेच त्याने तिला त्या ‘व्हॉइस रोल’साठी आमंत्रित केले होते.

विशेष म्हणजे, नेहाच्या वैयक्तिक आयुष्यातही करण जोहरची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. नेहा आणि अंगद बेदी यांच्या लव्ह स्टोरी दरम्यान त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्यात त्याने मदत केली होती. शिवाय, ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये करण पहिला पाहुणा म्हणून सहभागी झाला होता आणि त्यानंतरही तो अनेकदा या शोमध्ये दिसलेला.

अंगद बेदीशी लग्न

नेहा धुपियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, नेहाने 10 मे 2018 रोजी अभिनेता अंगद बेदीशी लग्न केले. या जोडप्याने दिल्लीत एका खाजगी समारंभात विवाह केला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली; त्यांची मुलगी ‘मेहर’चा जन्म नोव्हेंबर 2018 मध्ये झाला, तर मुलगा ‘गुरिक’चा जन्म ऑक्टोबर 2021 मध्ये झाला.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा