Headlines

‘ऑरिक’साठी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भूसंपादन नाही, नियोजनाला लागला ब्रेक:6 गावांत मोजणीच्या नोटिसा, मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रक्रिया ठप्प



ऑरिकच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भूसंपादनापूर्व मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र आम्हाला ऑरिकला जमिनी द्यायच्याच नाहीत, मग मोजणी कशाला, असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला आहे. यामुळे महिनाभरात मोजणी करण्याच्या प्रशासनाच्या नियोजनाला ब्र

.

ऑरिकच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पैठण तालुक्यातील पाडळी, निलजगाव तर संभाजीनगर तालुक्यातील घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव आणि गाडीवाट या ६ गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहे. नियोजनानुसार एका महिन्यात या गावातील जमिनींची मोजणी पूर्ण करण्यात येऊन एका वर्षामध्ये संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे.

आमच्या आक्षेपावर सुनावणी घ्या

जमिनी गेल्या तर पुढच्या पिढीचे काय होणार? ऑरिकमध्ये अनेक उद्योगांनी जमिनी घेतल्या, मात्र त्यावर उद्योग उभारणी झालेली नाही. मग आता नव्याने जमिनी कशासाठी घ्यायच्या, असा शेतकऱ्यांचा प्रश्न असून या आमच्या आक्षेपावर सुनावणी घ्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जमिनीची मोजणी का आवश्यक ?

जमिनीवर स्ट्रक्चर किती आहेत, फळझाडे आहेत काय, पीक कोणते आहे याचा सर्व्हे करण्यात येईल. त्यामुळे प्रथम मोजणी करावी व त्यानंतर शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यावर निर्णय घेण्यात येईल.

ऑरिकमुळे परिसराचे महत्त्व वाढले

ऑरिकच्या शेंद्रा आणि बिडकीन या दोन्ही नोडमध्ये जागतिक दर्जाच्या उद्योगांनी जागा घेतल्याने अन्सेलरी उद्योगांनीही ऑरिकला पसंती दिल्याने बिडकीन व पैठण परिसरातील गावांचे महत्त्व वाढले आहे. या भागात उद्योगासाठी घेतलेली मोठी जमीन शिल्लक नाही, त्यामुळे एमआयटीएलने जिल्हा प्रशासनाकडे ३२०० हेक्टर जमीन संपादनाची मागणी केली, नोटिफाइड जमीन असल्यामुळे प्रक्रियाही सुरू झाली. मात्र आता शेतकऱ्यांच्या विरोधामुळे खोडा निर्माण झाला आहे. १३ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीचे दर, ऑरिकनेही उद्योगांना जमिनीची विक्री चढ्या दराने केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत