Headlines

Nepal Flash Flood : पाऊस नसताना नेपाळमध्ये महापूर, गावं बुडाली, जनजीवन विस्कळीत; बचावकार्य सुरु



नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात आज २६ ऑगस्ट २०२६ झालेल्या भीषण महाप्रलयाने प्रचंड हाहाकार उडवला आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने एकाच क्षणात गावेच्या गावे उद्ध्वस्त केली असून शेकडो लोक बेपत्ता झालेत. उत्तुंग बर्फाच्छादित शिखरे, नयनरम्य दऱ्या आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य… नेपाळच्या रसुवा भागाची ओळख हीच होती. जगभरातून हजारो ट्रेकर्स आणि पर्यटक इथे हिमालयाची भव्यता अनुभवण्यासाठी येतात. पण २६ ऑगस्ट २०२६ च्या सकाळी या निसर्गाचे एक असे भयानक रूप समोर आले, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. नेपाळ-चीन सीमेजवळ भूकंपाच्या धक्का बसल्यानंतर काही मिनिटांतच त्रिशूली आणि भोटे कोशी नद्यांना असा भीषण पूर आला, ज्याने वाटेत येईल ते सर्वकाही उद्ध्वस्त केले. गावेच्या गावे पाण्याखाली गेली आहेत, शेकडो पर्यटक बेपत्ता आहेत आणि हजारो नागरिकांचे जीवन या महाप्रलयात कोलमडून पडले आहे. पण हा महाप्रलय नेमका आला कसा? केवळ भूकंप कारणीभूत होता की हिमनदी फुटल्याने हा विनाश झाला? बेपत्ता पर्यटकांची सद्यस्थिती काय आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून नेपाळच्या या महाप्रलयाची संपूर्ण स्टोरी समजून घेऊया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत