Headlines

Pakistani Actress Hania Aamir Drunk Video Viral ; Hania Aamir : दारू की अमली पदार्थांचा ओव्हरडोस? नशेत धुंद दिसली पाकिस्तानी अभिनेत्री, व्हिडिओ प्रचंड व्हायरल


Hania Aamir Viral Video : पाकिस्तानी अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती नशेत असल्याचा दावा केला जात आहे.

hania aamir
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमीर सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री काहीशा खेळकर मूडमध्ये दिसत आहे आणि तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून युजर्स विविध तर्कवितर्क लावत आहेत. काहींनी ती नशेत असल्याचा दावा केला आहे, तर काहींनी तिच्या अडखळत बोलण्यावर आणि वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींच्या मते तिने अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे तिला ओव्हर डोस झालाय. मात्र, हानिया आमीरने कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केले होते किंवा तिने ‘ओव्हरडोज’ घेतला होता, याला कोणतीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

व्हिडिओमध्ये काय दिसले?

सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हानिया आमीर कॅमेऱ्यासमोर दिसते. तिच्या अडखळत बोलण्याच्या पद्धतीवर सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली; काहींना तिचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा वाटला, ज्यामुळे ती नशेत असावी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दिसून येत आहेत..

Maharashtra TimesKriti Sanon : रक्षाबंधनाच्या जाहिरातीत क्रिती सेनॉनच्या कपड्यांवरुन भडकले प्रेक्षक, म्हणाले- सणवार दाखवायचा हा कोणता प्रकार!

युजर्सनी काय म्हटले?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काही युजर्सनी यावर विनोद केले, तर काहींनी तिच्या वागण्याला थेट नशेशी जोडले. याउलट, काहींनी असा युक्तिवाद केला की, केवळ व्हिडिओमधील बोलणे किंवा वागणे पाहून एखादी व्यक्ती नशेत होती असा निष्कर्ष काढणे अयोग्य आहे.

Maharashtra TimesRamdev Baba On Kangana Ranaut : हीन दर्जाच्या लोकांवर मला बोलायचंच नाही! बाबा रामदेव यांचा कंगना रणौतच्या आरोपांवर पलटवार

हानिया यापूर्वीही झाली आहे व्हायरल

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमीर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि तिचे व्हिडिओ अनेकदा चर्चेत असतात. अलीकडच्या काही महिन्यांत, गायक आसिम अझहरसोबतचे तिचे व्हायरल व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील चर्चांमुळेही ती चर्चेत राहिली आहे.

सध्या तरी, या व्हायरल व्हिडिओबाबत नशा किंवा ओव्हरडोजच्या दाव्यांना दुजोरा देणारे कोणतेही स्पष्ट निवेदन हानिया आमीरने दिलेले नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर फिरणारे हे दावे सध्या केवळ युजर्सचे तर्कवितर्क मानले जाऊ शकतात.

हानिया आमिरला ट्रोल का करण्यात आले?

व्हायरल व्हिडिओमध्ये हानियाची हेअरस्टाईल करत असल्याचे दिसत आहे. ती स्टायलिस्टला तिचे केस नीट करून डोक्यावर विग ठेवायला सांगते, ज्यामुळे तिला एक मजेशीर लुक मिळतो. ती त्यांना तिचे खरे केस लपवून खोट्या केसांनी एक ड्रामॅटिक लुक देण्यास सांगते. अभिनेत्री हॅलोविन साजरा करत आहे. व्हिडिओमध्ये हानिया अडखळत बोलत आहे. बोलताना ती मध्येच झोपाळू अवस्थेतही दिसते. ती मजेच्या मूडमध्ये आहे. चाहत्यांच्या मते ती नशेत आहे. नशेत असतानाही हानिया हॅलोविनसाठी खूप उत्साही दिसत आहे.

हानिया आमीरबद्दल बोलायचं झालं तर ही त्या पाकिस्तानी सौंदर्यवतींपैकी एक आहे, जिचा भारतातही मोठा चाहतावर्ग आहे. तिला पाकिस्तानी फिल्मइंडस्ट्रीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक मानले जाते. या अभिनेत्रीने ‘सरदार जी 3’ या पंजाबी चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत काम केले होते. भारत-पाकिस्तान वादामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही. तो केवळ परदेशी बॉक्स ऑफिसवरच प्रदर्शित झाला होता.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा