Headlines

Puneet Vashist : ‘शाहरुखमुळे सिनेमातून माझे सीन्स कट केले, बॉलिवूडनं दुर्लक्षित केलं, मला दारूचं व्यसन लागलं’, लोकप्रिय अभिनेत्याचा खुलासा


Puneet Vashist On Bollywood : लोकप्रिय अभिनेता पुनीत वशिष्टनं एका मुलाखतीत बॉलिवूडबद्दल भाष्य केलं असून ‘मला बॉलिवूडनं दुर्लक्षित केलं’ असं त्यानं म्हटलं आहे.

Puneet Vashist On Shah Rukh Khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – २६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा ‘जोश’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला तरी, पण आज हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. या चित्रपटानं शाहरुख खानला इंडस्ट्रीत एक ‘आउटसायडर’ म्हणून मोठी ओळख मिळवून दिली. मात्र, ऐश्वर्या राय बच्चन, प्रिया गिल, शाहरुख खान आणि चंद्रचूड यांसारख्या कलाकारांना ओळख मिळवून देणाऱ्या ‘जोश’ सिनेमामध्ये एक असा अभिनेताही होता, ज्याचे सीन्स शाहरुख खानमुळे कापण्यात आले. इतकंच नाही, तर बॉलिवूडनं त्या अभिनेत्याच्या मुलालाही बाजूला सारलं.

हा अभिनेत्री पुनीत वशिष्ट असून त्यानं ‘जोश’ व्यतिरिक्त ‘ताल’, ‘क्या कहना’, ‘स्टाईल’ आणि ‘फना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पूनम सचदेवच्या ‘दिल से दिल की बात’ या पॉडकास्टमध्ये, पुनीत वशिष्ट शाहरुख खानबद्दल बोलताना म्हणाला की, ‘मी स्वतः एका अभिनेत्याचा मुलगा आहे आणि अभिनयाच्या बाबतीत मी त्याला चांगलीच टक्कर देऊ शकतो. त्यामुळे, तो एक महान अभिनेता आहे असं मी म्हणणार नाही. त्याच्यात एका सुपरस्टारसारखी ऊर्जा आहे. मला वाटतं की, शाहरुख खान त्याच्या पिढीतील शेवटचा ‘आउटसायडर’ असून सुपरस्टार बनला आहे.’

Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ

‘जोश’ चित्रपटातून पुनीतचे सीन्स कट करण्यात आले

पुनीत वशिष्टनं सांगितलं की, ‘जोश’मध्ये शाहरुख खानला अधिक महत्त्व देण्यासाठी चित्रपटातून त्याचे काही सीन्स कट करण्यात आले. अभिनेता म्हणाला की, ‘जोशमधून बऱ्याच गोष्टी कट करण्यात आल्या. मी शाहरुख खानला प्रशिक्षणही दिलं होतं आणि त्याला माझ्या एनर्जीची चांगलीच कल्पना होती. त्यावेळी शाहरुख त्याच्या एनर्जीसाठी ओळखला जात होता. मात्र, जेव्हा शाहरुख १० फूट उडी मारायचा, तेव्हा मी आपोआप १४ फूट उडी मारायचो. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्यावर होतं.’

Maharashtra TimesMugdha Shah : सावत्र आईकडून छळ, मैत्रीण ठरली देवदूत, मृत्यूच्या दाढेतून परतली मराठी अभिनेत्री; सांगितला कठीण काळ
अभिनेता पुढे म्हणाला की, ‘यामुळेच त्यांनी माझे सीन कापले. कदाचित मी त्याच्या जागी असतो तर तेच केलं असते, पण मला नाही वाटत की मी तसा आहे. त्यावेळी मी फक्त २० वर्षांचा होतो. जो चित्रपट आम्हाला चार महिन्यांत पूर्ण करायचा होता, त्याला बनवायला चार वर्षे लागली. मात्र, मला ‘जोश’मधून खूप काही मिळालं. त्यावेळी मी काय गमावलं हेच पाहिलं, काय मिळवलं हे नाही.’

Maharashtra TimesAnangsha Biswas : ‘एका रात्रीचे किती पैसे घ्याल?’, ‘मिर्झापूर’मधील भूमिकेमुळे बदलली अभिनेत्रीची प्रतिमा; सांगितला वाईट अनुभव
‘त्या काळात गटबाजी होत होती. बॉलिवूडनं माझ्याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केलं. त्यांना जास्त एनर्जी असलेला अभिनेता नको होता. माझ्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा, ते मला टाळत होते. यामुळे मी दारूच्या व्यसनात आणि नैराश्यात बुडालो.’ असंही पुनीतनं शेवटी सांगितलं.