Prajakta Mali Post : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री लवकरच एका नव्या सिनेमात दिसणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या सिनेमामध्ये प्राजक्ता, ललित प्रभाकरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अशातच आता प्राजक्तानं चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासंदर्भात प्राजक्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता माळीचा आगामी सिनेमा
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या नव्या प्रोजेक्टची झलक चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये चित्रपटाच्या सेटवरील क्लॅपबोर्ड दिसत असून त्यावर ‘DINKS’ असं चित्रपटाचं नाव पाहायला मिळतंय. ‘DINKS – Double Income No Kids’ या चित्रपटाची निर्मिती नितीन वैद्य यांच्या प्रॉडक्शनकडून होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शक अजय मोंगा करत असून गौरव कुलकर्णी डीओपी आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथानकाबाबत आणि प्राजक्ताच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Mardini Movie : ‘पोलीस खातं आता मला पेन्शन देईल…’ जितेंद्र जोशीचा खास किस्सा
भूमिकेसाठी प्राजक्ताचा खास लूक
या चित्रपटासाठी प्राजक्तानं आपल्या लूकमध्येही बदल केला आहे.चित्रपटासाठी तिनं केस कापले असून आता ती शॉर्ट हेअर गर्ल झाली आहे. फोटोमध्येही तिच्या नव्या हेअरस्टाइलची झलक पाहायला मिळते. प्राजक्तानं या चित्रपटाबद्दल लिहिताना ही कथा तिच्या वयोगटाशी संबंधित आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचं म्हटलं आहे.
DINK ही संकल्पना काय आहे?
‘DINK’ हा Double Income, No Kids या संकल्पनेचा संक्षिप्त शब्द आहे. म्हणजे दोन्ही पार्टनर्स कमावतात, मात्र त्यांना मुलं नसतात किंवा मुलं न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. बदलत्या शहरी जीवनशैलीत हा विषय गेल्या काही वर्षांत चर्चेत आला आहे. करिअर, आर्थिक स्वातंत्र्य, वैयक्तिक निवडी आणि नातेसंबंध यांसारख्या अनेक मुद्द्यांशी ही संकल्पना जोडली जाते.
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेनं तिला लोकप्रियता मिळवून दिली. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतेय. तसंच प्राजक्तानं ‘हंपी’, ‘पांडू’, ‘लॉकडाऊन लग्न’ यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. इतकंच नव्हे तर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटातून तिनं निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. अभिनयासोबतच प्राजक्ता व्यवसाय क्षेत्रातही सक्रिय आहे. मात्र, आता अभिनेत्रीला ‘DINK’ या सिनेमातून नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा