Tajdar Amrohi : कमाल अमोरही आणि मीना कुमारी यांच्या अफेअरची आजही चर्चा होते. अशातच आता त्यांच्या लग्नाबद्दल कमाल अमरोही यांचा मुलगा ताजदार यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांची प्रेमकहाणी आजही चर्चेत असते. दोघांनी १९५२ मध्ये लग्न केलं. मात्र, या लग्नाबद्दल कमाल अमरोही यांच्या पहिल्या पत्नीला माहिती नव्हतं. कमाल अमरोही यांचा मुलगा, ताजदार अमरोही यांनी कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.
मीना कुमार यांच्याबद्दल काय म्हणाले ताजदार अमरोही?
ताजदार अमरोही यांनी सांगितलं की, कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या लग्नाची बातमी त्यांच्या कुटुंबापर्यंत थेट कमाल यांनी पोहोचवली नव्हती. त्या काळात त्यांची आई आणि मुलं उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे राहत होती आणि या लग्नाबद्दल माहिती त्यांना एका फिल्म मॅगझिनमधून मिळाली. याबद्दल बोलताना ताजदार अमरोही म्हणाले की, ‘माझी आई जुन्या विचारांची स्त्री होती आणि तिचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. तिला चित्रपटांबद्दल काहीही माहीत नव्हतं. त्या काळी ‘शमा’ नावाचं एक लोकप्रिय मासिक होतं. त्याची हिंदी आवृत्ती ‘सुषमा’ नावानं यायची. त्या मासिकात तिनं कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या अफेअरबद्दल एक लेख वाचला. त्यावेळी मीना कुमारी भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या.’
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
मीना कुमारी यांना ताजदार ‘छोटी अम्मी’ म्हणायचे. मुलाखतीदरम्यान, एवढा मोठा धक्का बसूनही कमाल यांना जाब विचारला नाही का? असं विचारला असता ताजदार म्हणाले, ‘माझ्या आईनं वडिलांना कधीच ‘छोटी अम्मी’बद्दल जाब विचारला नाही. तिने त्यांच्यावर कधीही विश्वासघाताचा आरोप केला नाही. आईनं शेवटच्या श्वासापर्यंत वडिलांना याबद्दल विचारलं नाही. कोणाचीही माझ्या आईसमोर माझ्या वडिलांबद्दल वाईट बोलण्याची हिंमत नव्हती. ती ते अजिबात सहन करायची नाही.’
Baldev Puri : ‘अभिनेत्रीचे तिघांसोबत संबंध होते’, पती-पत्नीची अफेअर्स; बॉलिवूड जोडप्याबद्दल डिटेक्टिव्हचा दावा ‘जेव्हा आईला समजलं की छोटी अम्मीची प्रकृती ठीक नाहीये, तेव्हा ती तिला भेटायला आली. माझी आई तिला भेटली, तेव्हा तिनं स्वतःच्या हातातील बांगड्या काढल्या आणि छोटी अम्मीला घातल्या. बांगड्या घालताना ती म्हणाली, ‘माझा नवरा तुझ्याबरोबर आनंदी आहे.’ माझ्या आईनं तिचे अश्रू कधीच कोणाला दाखवले नाहीत. ती रागवायची, पण दुसऱ्या महिलेनं तिचा पती हिरावून घेतलाय, हे कधीच तिनं चेहऱ्यावर दाखवलं नाही. माझे वडील नेहमी घरी पैसे पाठवायचे. त्यांनी नेहमी माझ्या आईची काळजी घेतली आणि आमचं शिक्षणही केलं.’ असं ताजदार यांनी शेवटी सांगितलं. ‘विकी लालवानी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ताजदार बोलत होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा