Headlines

IIFL Finance Share Price Hike Reason ; सोन्याच्या किंमतीत वाढ अन् Gold Loan कंपन्यांची चांदी; IIFL Finance च्या शेअरमध्ये आज इतकी तेजी का?


गोल्ड लोन क्षेत्रातून महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतातील बहुतेक गोल्ड लोन कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांतील एक IIFL Finance च्या शेअरने उच्चांक गाठला आहे. या कंपनीचे शेअर्स 8% ने वाढले आहे, तसेच 687 रुपयांवर पोहचले आहे. जानेवारी 2026 महिन्यात या कंपनीच्या शेअरने 674.95 रुपयांच्या रकमेने मागील उच्चांक गाठला होता. शेअरचा 52-Week low पाहिला तर त्यात 68% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. एकंदरीत, IIFL Finance च्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे आणि शेअरने उच्चांक गाठला आहे. फक्त IIFL Finance कंपनीचे शेअर नव्हे तर गोल्ड लोन क्षेत्रातील अनेक मुख्य कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

गोल्ड लोन क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये अचानक वाढ का?

फक्त IIFL Finance चे शेअर्स नव्हे तर गोल्ड लोन पुरवणाऱ्या कंपन्या जसे की Muthoot Finance आणि Manappuram Finance च्या शेअर्समध्येही तेजी आली आहे. JPMorgan ने रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये या तिन्ही कंपन्यांना Overweight दाखवण्यात आले आहे. JPMorgan च्या रिपोर्टनुसार, या कंपन्यांचे शेअर्स येत्या काळात उत्तम कामगिरी करू शकतात. JPMorgan च्या Report मुळे गुंतवणूकदारांनी या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये विशेष रस दाखवला. परिणामी, गुंतवणूक वाढली आणि कंपन्यांचे शेअर्सचे भावही वाढले. एकंदरीत, JPMorgan च्या रिपोर्टमुळे कंपनीच्या शेअरला फार मोठा फायदा झाला आहे.

सोन्याचा भाव वाढला

ऑगस्ट 2026 च्या सुरुवातीला मुंबईत सोन्याचा भाव 1,44,220 रुपये प्रति 10 ग्राम होता. मुंबईतील सोन्याचा आजचा दर 1,59,280 रुपये प्रति 10 ग्राम आहे. कालचा आकडा पाहिला तर एका दिवसांत सोन्याच्या किंमतीत 4,300 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ गोल्ड लोन कंपन्यांसाठी फायद्याची ठरते.

सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ, गोल्ड लोन कंपन्यांसाठी फायद्याची कशी?

Maharashtra Timesएफडी धारकांसाठी आनंदाची बातमी! आता दररोज कळणार परताव्याचा आकडा; RBI चा नवा नियम, जाणून घ्यागोल्ड लोन कंपन्या कर्ज देतात पण त्यासाठी सोने तारण ठेवावे लागते. अशात सोन्याची किंमत वाढली तर जे सोने गोल्ड लोन कंपनीकडे तारण म्हणून जमा आहेत, त्यांच्याही किंमती वाढतात. सोन्याच्या किंमती वाढल्या की अशा कंपन्यांची कर्ज देण्याची क्षमताही वाढते. कर्ज देण्याच्या रक्कमेत वाढ झाल्यामुळे त्यावर मिळणार व्याजही वाढतो आणि कंपनीचा फायदा होतो. कंपनीच्या उत्तम परफॉर्मन्समुळे गुंतवणूकदार आकर्षित होतात आणि जास्त शेअर खरेदी करतात. परिणामी, कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येते.

फक्त सोने नाही तर विविध क्षेत्रांमध्ये IIFL Finance कार्यरत

IIFL Finance नॉन बँकिंग संस्था आहे. गोल्ड लोनसहित होम लोन, MSME लोन तसेच इतर रिटेल लोन पुरवण्यातही कंपनी कार्यरत आहे. कंपनी आता तारण घेऊन कर्ज देण्यावर जास्त भर देत आहे. कंपनीचे जून 2026 चा तिमाही निकाल पाहिला तर आरओई 19.5% आहे. आरओए 3.1% आहे. एकंदरीत, कंपनीचा नफा आणि व्यवसायाची गुणवत्ता सुधारत आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत