Awarapan 2 one week box office collection: गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळाली. इम्रान हाश्मीचा आवारापन २ आणि सनी देओलचा बटवारा १९४७. या पैकी आवारापन २ हा वरचढ ठरला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीच्या बहुप्रतिक्षीत ‘आवारापन २’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांत या सिनेमानं प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल ११३ कोटी रुपयांची कब्बळ कमाई केली आहे.
पहिल्या आठवड्याची कमाई
नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटानं पहिल्याच दिवशी २२ कोटी रुपयांची जोरदार सुरुवात केली होती. शनिवार आणि रविवारी या वीकेंडला प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी केली, ज्यामुळं पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने ८० कोटींचा टप्पा गाठला. सोमवार आणि मंगळवारच्या वर्कींग डेमध्येही चित्रपटाची पकड मजबूत होती. सातव्या दिवशी (गुरुवारी) चित्रपटाने देशभरात सुमारे ६ कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केलं. यासह चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन ११३.५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
वर्ल्ड वाइल्ड बॉक्स ऑफिसवर १६० कोटींचा टप्पा पार
तर केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘आवारापन २‘ ची जादू चालली आहे. चित्रपटानं आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच वर्ल्ड वाइल्ड बॉक्स ऑफिसवर २६ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्याअखेर चित्रपटाचं वर्ल्ड वाइल्ड कलेक्शन तब्बल १६१.६७ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
चित्रपटाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून वितरकांनी शोच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला देशभरात ९,००० हून अधिक शो मिळाले होते, तर सातव्या दिवशी ही संख्या वाढून १०,८०० पेक्षा जास्त झाली. मुंबई आणि दिल्ली-एनसीआर क्षेत्रात चित्रपटाचे ऑक्युपन्सी रेट अजूनही उत्तम आहेत. तर सोबत प्रदर्शित झालेल्या ‘बटवारा १९४७’ या चित्रपटाला पछाडत ‘आवारापन २’ नं बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे.
इम्रान हाश्मीचा हा सलग दुसरा चित्रपट आहे ज्यानं १०० कोटींच्या क्लबमध्ये वेगाने प्रवेश केला आहे. सध्या सोशल मीडियावर इम्रानची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. त्याचा मोठा फायदा सिनेमाला होतोय. त्याच्यासोबत या चित्रपटात दिशा पटानी आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे दुसरा वीकेंडही या चित्रपटासाठी फायदेशीर ठरेल, असा अंदाज चित्रपट विश्लेषक व्यक्त करत आहेत.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा