न्हावेली /वार्ताहर : जय हनुमान भजन मंडळ,आरोस बाजार आयोजित शनिवार २२ ऑगस्ट रोजी हनुमान मंदिरात जिल्हास्तरीय अंभग गौळण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता होणार आहे.यावेळी माजी सरपंच नेमळे मुख्य मार्गदर्शक विनोद राऊळ,जिल्हा परिषद सदस्य तथा उपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग संदिप गावडे,सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,जिल्हा परिषद सदस्य अर्पणा सातोसकर,युवा उद्योजक भाजप विशाल परब उपस्थित राहणार आहेत.हा स्पर्धा संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल.
स्पर्धेत सहभागी भजन संघ – श्री म्हाळसाई भजन मंडळ,मळगाव ( बुवा – रितेश मांजरेकर ) स्वराभिषेक भजन मंडळ,मणेरी ( बुवा – गितेश कांबळे ) माऊली गिरोबा भजन मंडळ,आरोस ( बुवा – कु.अन्वी धारगळकर ) गुरुकृपा भजन मंडळ,न्हावेली घोडेमुख ( बुवा – रोहित निर्गुण ) स्वरभूषण मित्रमंडळ,न्हावेली ( बुवा – सुरज पार्सेकर ) मोरेश्वर भजन मंडळ,नेरुर ( बुवा – भार्गव गावडे ) गुरुकुल संगीत भजन मंडळ,कुडाळ ( बुवा – अद्धैत पालव ) श्री ब्राह्मणदेव महिला भजन मंडळ,पावशी ( बुवा – प्रियांका तवटे ) सद्गगुरु भजन मंडळ,अणसूर ( बुवा – कौस्तुभ धुरी ) श्री देव इसोटी भजन मंडळ,मातोंड ( बुवा – सचिन सावंत ) श्री रवळनाथ भजन मंडळ,घोडगे ( बुवा – हर्षद ढवळ ) महापुरुष भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोकर श्री देव सिद्धेश्वर भजन मंडळ,कोंडुरा वेंगुर्ला ( बुवा – विवेक पेडणेकर ) सिद्धीविनायक भजन मंडळ, कणकवली ( बुवा – दुर्गेश मिठबावकर ) स्वरधारा भजन मंडळ,तांबोळी ( बुवा – अमित तांबोळकर )यांचा समावेश आहे .
प्रथम पारितोषिक ७००० रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक ५००० रुपये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक ३००० रुपये व सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ट हार्मोनियम,व तालरक्षक प्रत्येकी ५०० रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे कुलदिप ७४९९२६५१८४ व ललित नाईक यांच्याशी संपर्क साधावा.
