Headlines

ओटवणे येथील सौ राजश्री वर्णेकर यांचे निधन


ओटवणे प्रतिनिधी : ओटवणे मांडवफारवाडी येथील रहिवाशी सौ राजश्री राजाराम वर्णेकर (६५) यांचे गुरुवारी दुपारी आकस्मित निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाचा वर्णेकर कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत वर्णेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे, जावई असा परिवार आहे. ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, श्री सती देवी कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष तथा भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कुडाळ शाखेचे निवृत्त कर्मचारी राजाराम वर्णेकर यांच्या त्या पत्नी तर सामाजिक युवा कार्यकर्ते शंकर वर्णेकर आणि शैलेश वर्णेकर यांच्या त्या मातोश्री होत. तसेच कारिवडे येथील आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक डी. बि. साईल यांच्या त्या बहिण होत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत