Headlines

आशियात 5 आघाड्यांवर अमेरिका हटली मागे:थेट लाभ घेत चीन वाढवतोय वर्चस्व, पश्चिम प्रशांतमधून युद्धनौका हटवली, द. कोरियासोबत लष्करी सरावही कमी


  • Marathi News
  • International
  • America Retreated On 5 Fronts In Asia, China Is Increasing Its Dominance By Taking Direct Advantage, Warships Removed From The Western Pacific, Military Exercises With South Korea Also Reduced

वॉशिंग्टन5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आशियामध्ये पाच आघाड्यांवर अमेरिकेची उपस्थिती दुबळी होताना दिसत आहे. दक्षिण कोरिया, जपान, तैवान, इंडोनेशिया आणि पश्चिम प्रशांत क्षेत्रातून असे संकेत मिळाले आहेत. ताजे प्रकरण द. कोरियाचे आहे. ट्रम्प यांनी सोमवारी ११ दिवसांचा लष्करी सराव छोटा करण्याचे निर्देश दिले.

याच्या ११ दिवस आधी विमानवाहू नौका ‘युएसएस जॉर्ज वॉशिंग्टन’ व्हिएतनाममधून हटवण्यात आली. इतर आघाड्यांवरही अनिश्चितता आहे. जपानच्या ४०० टॉमहॉक क्षेपणास्त्र पुरवठ्याला उशीर होऊ शकतो. तैवानचा २० हजार कोटींचे शस्त्रास्त्र पॅकेजही अडकले आहे. नागोया व इंडोनेशियाच्या मैदान येथील अमेरिकी उपदूतावास बंद होणार आहेत. याच दरम्यान चीनने फिलीपिन्सजवळ लष्करी सराव केला, जपानचा दावा असलेल्या सागरी क्षेत्रात थेट गोळीबार केला.इंडोनेशियाच्या युद्धनौकेसोबत तैवानच्या पूर्वेला नौदल हालचाली वाढवल्या आहेत.

पॉवर इंडेक्स: अमेरिकी ताकद आशियात सर्वांत खाली आली

लोवी इन्स्टिट्यूटच्या २०२५ आशिया पॉवर इंडेक्समध्ये अमेरिका ८०.४ अंकांसह पहिल्या व चीन ७३.७ अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे. २७ देशांच्या इंडेक्समध्ये गतवर्षी अमेरिकेची रेटिंग जास्त घसरली. त्याचा स्कोर २०१८ मध्ये इंडेक्स सुरू झाल्यानंतर सर्वांत खाली पोहोचला आहे.

नाटोत अमेरिकेवरील विश्वास तुटला, युरोप क्षमता वाढवतोय

चीनसोबत थेट आघाडी करण्याऐवजी युरोप अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करून आपली ताकद वाढवत आहे. गॅलपच्या ३१ नाटो देशांत अमेरिकी नेतृत्वावर विश्वास २०२५ मध्ये १४ अंकांनी घसरून २१% पोहोचला; चीन २२% होता. युरोपीय संघाची स्वीकृती ६०% राहिली.

सर्व्हे: २२ देशांत शी जिनपिंग ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त विश्वासू

प्यू रिसर्च सेंटरच्या सर्व्हेत ३६ देशांच्या तुलनेत २५ ठिकाणी चीनची प्रतिमा अमेरिकेपेक्षा चांगली निघाली. जिनपिंग यांच्यावर २२ देशांत ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त विश्वास आहे. ३६ देशांच्या सर्व्हेत चीनसाठी मिडियन फेव्हरेबल रेटिंग ५१% होती.अमेरिकेसाठी हा आकडा ३७% होता.

पकड: ५३ आफ्रिकी देशांना झीरो टॅरिफ, लॅटिन अमेरिकेत कर्ज आणि बंदरांद्वारे प्रभाव वाढवला

जागतिक पकड वाढवण्यासाठी बाजार, बंदरे, कर्ज व राजनैतिक नेटवर्कवर चीन डाव लावत आहे. मे मध्ये चीनने ५३ आफ्रिकी देशांच्या उत्पादनांवर झीरो टॅरिफ लागू केला. लॅटिन अमेरिका व कॅरिबियन देशांना २०१४ ते २०२३ दरम्यान चीनने १४.६५ लाख कोटींचे कर्ज व अनुदान दिले, अमेरिकेचा हा आकडा ४.८६ लाख कोटी रु. राहिला. पेरूमध्ये १३ हजार कोटींचे लॉजिस्टिक हब बनवत आहे. बेल्ट अँड रोड उपक्रमात समाविष्ट होताच चीनने कोलंबियासाठी ९३ हजार कोटींची क्रेडिट लाइन दिली.जागतिक क्रमवारीत चीनच्या २७४ परदेशी राजनैतिक पोस्ट तर अमेरिकेच्या २७१ आहेत.

आशियात खेळ: तैवान-जपानवर लष्करी दबाव, इंडोनेशिया-कोरियाशी जवळीक

आशियामध्ये चीन दोन रणनीतींवर काम करत आहे. जिथे विवाद आहे, तिथे लष्करी दबाव वाढवत आहे; जिथे संबंध सुधारू शकतात, तिथे जवळीक वाढवत आहे. फिलीपिन्ससमोर १ ऑगस्टला चीनने नौदल व हवाई सराव करून ताकद दाखवली. जपानजवळ १९ जुलैला चिनी विनाशिकेने थेट गोळीबार केला. तैवानजवळही चिनी लष्करी उपस्थिती कायम आहे. दुसरीकडे चीनने इंडोनेशियासोबत तैवानच्या पूर्वेला संयुक्त नौदल सराव केला. दक्षिण कोरियाशी संबंध सुधारण्यासाठी जानेवारीत शी जिनपिंग आणि ली जे-म्युंग यांची शिखर परिषद झाली. दोन्ही देशांत १५ सहकार्य करार झाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत