Headlines

Malaria Cases Mumbai: मुंबई तापाने फणफणली! तीन महिन्यांत मलेरियाच्या 3 हजार रुग्णांची नोंद; डेंग्यूचे 1079, तर H1N1चे 309 रुग्ण – mumbai 3177 malaria cases were detected between june and 15 august 2026


मुंबई : पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पावसाळी आजारांचा धोका मुंबईत कायम आहे. मलेरिया आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत यंदा लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत मलेरियाचे ३,१७७ रुग्ण आढळले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या २,८५२ होती. एच१एन१चे रुग्णही ७२ वरून ३०९ पर्यंत वाढले आहेत.

दुसरीकडे, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रो आणि कोविडच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. डेंग्यूचे रुग्ण १,२१७ वरून १,०७९ झाले, तर चिकनगुनियाची संख्या २७९ वरून केवळ ३३ इतकी खाली आली आहे.

Maharashtra TimesMumbai Crime : तुला जायचं तर जा, मुलांना कुठेही न्यायचं नाही; मुंबईतील नौदल जवानाच्या कुटुंबाच्या मृत्यूमागे वैवाहिक वाद? दोन महिन्यांच्या बाळालाही संपवलं३० हजार बांधकाम

कामगारांना प्रशिक्षण

मुंबईतील ४,०७५ बांधकामस्थळांवर ‘आरोग्यसाथी’ उपक्रम राबवण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी पाच ते दहा कर्मचाऱ्यांचा सहभाग घेऊन एकूण २० ते ३० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत १२६ बांधकामस्थळांवरील १,६२२ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

२६ लाख नागरिकांचे सर्वेक्षण

मुंबई महापालिकेने १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ५,६३,३८२ घरांचे सर्वेक्षण केले. या मोहिमेत २६,८५,८२८ मुंबईकरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२,१५८ रक्तनमुने संकलित करण्यात आले. लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार घेतलेल्या मुंबईकरांची संख्या १०,५४२ नोंदवण्यात आली आहे.

Maharashtra TimesHigh Court on FDA : तुकाराम मुंढेंच्या एफडीएला तब्बल 5 लाखांचा दंड! मुंबई हायकोर्टाचा दणका, नेमकं प्रकरण काय?‘आजाराची लक्षणे दिसल्यास संपर्क साधा’

साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, गमबूट वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात साचलेले पाणी काढून टाकणे, घराभोवती डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे, तसेच कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे दिसल्यास पालिकेच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.

डासांच्या उत्पत्तीस्थळांची तपासणी
मलेरिया नियंत्रण मोहिमेत १७,७९३ संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३,३१९ ठिकाणी अनोफिलीस डासांची पैदास आढळली. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या एडिस डासांची उत्पत्तीस्थळे ११,२२७ ठिकाणी सापडली. ई, के-पश्चिम, जी-दक्षिण, एफ-दक्षिण आणि एच-पश्चिम विभागांत मलेरियाचे रुग्ण वाढल्याची नोंद आहे.

रुग्णसंख्येतील बदल

आजार— मागील वर्षी— यंदा— बदल

मलेरिया—– २,८५२— ३,१७७— +३२५

एच१एन१—– ७२— ३०९— +२३७

डेंग्यू—– १,२१७— १,०७९— -१३८

चिकनगुनिया—– २७९— ३३— -२४६

लेप्टोस्पायरोसिस—– ३२२— १८९— -१३३

गॅस्ट्रो—– २,२७४— १,७५२— -५२२

कोविड—– ६६८— १२४— -५४४

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत