Nashik Vasant Satpute Murder Case Live in Partner Hasina Shaikh kills with New Boyfriend Crime News; पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशन, पण 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेण्ड मिळाला, सातपुतेने रंगेहाथ पकडताच भयंकर घडलं, बॉडी कसारा घाटात
Nashik Vasant Satpute Murder Case Live in Partner Hasina Shaikh kills with New Boyfriend Crime News; पंधरा वर्ष लिव्ह इन रिलेशन, पण 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेण्ड मिळाला, सातपुतेने रंगेहाथ पकडताच भयंकर घडलं, बॉडी कसारा घाटात
Nashik Live in Partner Murder : पंधरा वर्षे ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहिल्यानंतर दुसऱ्याच तरुणाशी सूत जुळलं. नव्या प्रियकराच्या साथीने आधीच्या जोडीदाराचा काटा काढून त्याला कसारा घाटातील दरीत फेकल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पंधरा वर्षे ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये एका छताखाली राहिलेल्या व्यक्तीचा नव्या प्रियकराच्या साथीने काटा काढून त्याची बॉडी कसारा घाटातील दरीत फेकून पुरावे नष्ट करणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराने रचलेली ‘मर्डर मिस्ट्री’ ट्रक चालकाच्या तक्रारीतून उलगडली. या प्रकरणी नाशिकमधील इंदिरानगर पोलिसांत हसीना हबीब शेख (वय ३७, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा) हिच्याविरुद्ध अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमाच्या त्रिकोणातून संघर्षाची ठिणगी
पाथर्डी फाटा येथील स्वराज्य नगरमधील रो-हाऊसमध्ये वसंत गोरखनाथ सातपुते (वय ३९) आणि संशयित हसीना शेख हे मागील १५ वर्षांपासून ‘लिव्ह-इन’मध्ये राहत होते. वसंत हा बेरोजगार असल्याने, त्याचा खर्च हसीनाच करत होती. हसीनाच्या आयुष्यात साहिल शहा (रा. वडाळागाव) या नवीन प्रियकराचा प्रवेश झाला. प्रेमाच्या त्रिकोणातून संघर्षाची ठिणगी पडली. त्यातूनच वसंत सातपुते याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
…असा झाला उलगडा
पाच ऑगस्टच्या सायंकाळी वसंत घरात झोपलेला असताना हसीनाचा प्रियकर साहिल भेटण्यासाठी आला. त्यावेळी वसंतला जाग आली. त्याने साहिलला बघितल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण व झटापट झाली. या रागातून साहिलने हसीनासमोरच वसंतचा गळा आवळून त्याला मारले. हत्या केल्यानंतर हसीनाने साहिलला साथ देत गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. दोघांनी वसंतचं शव कारमध्ये टाकलं आणि रात्री नेत कसारा घाटातील दरीत फेकून दिला. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी ट्रक चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.
दुसरीकडे, जेवणासाठी थांबलेल्या ट्रेलरचालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री मुंबई-नाशिक महामार्गावर घडला. या प्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पवनकुमार महतो (३३) असे मृत चालकाचे नाव आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर एका चालकाला चाकू भोसकून मारल्याची माहिती रविवारी रात्री तीनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या कोनगाव पोलिसांना मिळाली. तत्काळ पोलिस रांजनोळी येथे गेले असता, त्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ही व्यक्ती ट्रेलरचा चालक महतो असल्याचे स्पष्ट झाले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा