Saba Pataudi On Religion : सबा पतौडीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये धर्माबद्दल भाष्य केलं आहे. शर्मिला टागोर यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यांनी मुलांनाही त्याच धर्माची शिकवण दिली. सबा म्हणाली की, आईनं दिलेल्या शिकवणीमुळे आम्ही हिंदू धर्माचं आचरण केली नाही. पण, मी इतर धर्माचं पालन करत नाही, असंही नाहीये.

धर्माबद्दल काय म्हणाली सबा पतौडी ?
‘बिग बॉलिवूड बफ्स’ला दिलेल्या मुलाखतीत सबानं सांगितलं की, तिच्या आईनं लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आणि मुलांनाही या धर्माची ओळख करून दिली. मात्र, मुलांवर कोणताही धर्म स्वीकारण्याची सक्ती करण्यात आली नाही. सबानं सांगितलं की, आई शर्मिला टागोर यांनी आपल्या मुलांना इस्लाम, रमजान आणि त्या धर्माशी संबंधित श्रद्धा-परंपरांची माहिती दिली. मुलांनी धार्मिक बाबतीत गोंधळून जाऊ नये आणि त्यांना एक आधार मिळावा, हा त्यामागचा उद्देश असावा, असं सबानं सांगितलं.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
सबा म्हणाली की, ‘माझ्यासाठी माझा धर्म इस्लाम आहे आणि माझं त्याच्याशी नातं आहे. मी अध्यात्मिकही आहे. कारण, जर मला देवाचा विचार करायचा झाला, तर मी कदाचित अल्लाह म्हणेन. याचा अर्थ असा अजिबात नाही की, मी इतर धर्मांचा आदर करत नाही. आई-बाबांचं लग्न झाल्यानंतर आईनं इस्लाम धर्म स्वीकारला आणि आम्हालाही इस्लाम धर्माची शिकवण दिली. कदाचित आम्ही गोंधळून जाऊ नये आणि आम्हाला एक आधार मिळावा, हा त्यामागचा उद्देश असावा. त्यामुळे आम्ही मंदिरात जात नव्हतो आणि हिंदू धर्माचं आचरणही करत नव्हतो.’
Mini Mathur : ‘माझ्या सासरचे लोक धार्मिक नव्हते’, मुस्लीम दिग्दर्शकासोबत लग्न, आंतरधर्मीय विवाहाबद्दल स्पष्टच बोलली लोकप्रिय अभिनेत्री
सबा पुढे म्हणाली की, ‘खरं तर, आईनेच मला माझ्या धर्माची आणि इस्लाम, रमजान यांसारख्या गोष्टींची ओळख करून दिली. त्यानंतर पुढे कोणत्या धर्माचं आचरण करायचं, हा निर्णय आमच्यावर सोपवण्यात आला. माझ्या वडिलांनी किंवा आईनं किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीनं आमच्यावर कोणत्याही एका धर्माचं पालन करायचा हा निर्णय लादला नाही. माझ्या भावंडांनी आंतरधर्मीय लग्न केली आहेत. मला वाटत नाही की, त्यांच्यापैकी कोणीही या सगळ्या गोष्टीचं अगदी काटेकोरपणे पालन करतं.’
Nakul Ghanekar : पायात घुंगरू घातल्यावर लोक चिडवायचे, डावरा असल्यामुळे हिणवायचे, पण बाबांनी सोडली नाही साथ; ‘ठरलं तर मग’ फेम सचिननं सांगितला कठीण काळ
‘आम्ही ख्रिसमस, दिवाळी, होळी असे सर्व सण साजरे करतो. माझ्या मते हेच योग्य आहे आणि प्रत्येक पालकाने असंच करायला हवं.’ असंही सबानं शेवटी सांगितलं.
Sankarshan Karhade : जपान मधल्या भारतीयांच्या कृतीनं भारावला संकर्षण कऱ्हाडे, स्वातंत्र्यदिनी अभिनेत्यानं शेअर केला खास अनुभव
एका जुन्या मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी धर्म बदलण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं होतं. हा निर्णय सहजपणे घेण्यासारखा नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं. लग्नानंतर त्यांना हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

