वार्षिक खर्च २२ लाख
सध्या हे जोडपे त्यांच्या लाईफस्टाईल गरजांवर वर्षाला सुमारे २२ लाख रुपये खर्च करतात. त्यांची संपत्ती रिअल इस्टेट, भारतीय शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स, अमेरिकन शेअर्स, रोख रक्कम आणि निवृत्तीसाठीची बचत अशा विविध माध्यमांमध्ये गुंतवलेली आहे.
विविध माध्यमांत गुंतवणूक
त्यांच्या सध्याच्या मालमत्तेचे वाटप पाहता, रिअल इस्टेटमध्ये सुमारे ३.२ कोटी रुपये, भारतीय शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये १.८ कोटी रुपये, अमेरिकन शेअर्समध्ये ५ कोटी रुपये आणि रोख रक्कम व निवृत्ती बचतीमध्ये १.५ कोटी रुपये यांचा समावेश आहे.
निवृत्तीचा निर्णय घेण्यापूर्वी आणखी दोन ते तीन वर्षे काम सुरु ठेवण्याची त्यांची योजना आहे. चाळिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक जोडप्यांप्रमाणे त्यांना मुलांचे उच्च शिक्षण, लग्न किंवा कुटुंब सांभाळण्याशी संबंधित इतर मोठ्या खर्चांसाठी निवृत्तीचा निधी (कॉर्पस) उभा करावा लागत नाही.
Tukaram Mundhe : फास्ट फूड आऊट, पौष्टिक पदार्थ इन; मुंबईतील शाळांमध्ये तुकाराम मुंढेंच्या FDA चा प्रशिक्षण वर्ग, कँटीन मेन्यूमध्ये बदलतरीही, त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत. त्यांचे पालक निवृत्त झाले आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जरी त्यांनी लवकर काम थांबवले तरीही पालकांना आरामात आधार देण्यासाठी पुरेशी आर्थिक सुरक्षितता राखण्याची त्यांची इच्छा आहे.
‘एक्स’ सोशल मीडियावरील अमित अरोरा यांनी आपल्या चुलत भाऊ आणि त्याच्या पत्नीविषयी दिलेल्या माहितीवरुन ‘मनी कंट्रोल’ वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यांच्यासाठी आरोग्याची काळजी ही अधिक महत्त्वाची बाब ठरत असल्याचे दिसते.
ताणतणाव असलेली नोकरी
त्यांच्या नोकऱ्यांमध्ये कामाचे दीर्घ तास, सततचा ताण आणि कामातून फारसा मोकळा वेळ न मिळणे अशा गोष्टींचा समावेश आहे. या जीवनशैलीचे शारीरिक परिणामही त्यांना जाणवू लागले आहेत, ज्यामुळे अधिक संपत्ती जमा करण्यासाठी त्याच वेगाने काम करत राहणे योग्य आहे का, याचा ते फेरविचार करत आहेत.
त्यांची चर्चा आता “आपण आणखी किती कमवू शकतो?” यापासून “किती संपत्ती पुरेशी आहे?” याकडे वळली आहे. पत्नीचे मत त्या पोस्टमध्ये अशा प्रकारे मांडले गेले आहे: “आम्ही आमच्याची तारुण्याची वर्षे पैसा कमवण्यात घालवली. कदाचित आता त्यातील काही पैसा आमच्या स्वतःच्या आयुष्यावर खर्च करण्याची वेळ आली आहे.”
ही माहिती ‘एक्स’ वर शेअर करताना अमित अरोरा यांनी या जोडप्याच्या आर्थिक स्थितीचे कौतुक केले, परंतु त्यांचे अंतिम उद्दिष्ट मोठी संपत्ती जमा करणे हे असावे की अधिक स्वातंत्र्य मिळवणे, असा प्रश्न उपस्थित केला.
Mumbai News : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील 15 एकर जागा ‘अदानी’ कंपनीला, 98 कोटींना पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मंजुरी“३८ व्या वर्षी अशी आर्थिक स्थिती असणे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वातंत्र्याला प्राधान्य देत आहेत की अधिक संपत्तीला. निवृत्तीला विलंब करण्यास त्यांना कशामुळे प्रवृत्त केले जाऊ शकते?” या पोस्टमुळे एका चर्चेला तोंड फुटले.
नेटिझन्समध्ये चर्चा रंगली
तिशीच्या उत्तरार्धात असताना ११.५ कोटी रुपयांची संपत्ती त्या जोडप्याला काम थांबवण्यासाठी पुरेशी आहे का? विशेषतः त्यांचा वार्षिक खर्च, पालकांना आधार देण्याची शक्यता आणि त्यांची गुंतवणूक अनेक दशके टिकण्याची गरज लक्षात घेता हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
एका युजरने त्या जोडप्याचे राहण्याचे ठिकाण आणि त्यांची मिळकत (उत्पन्न) यांच्या संदर्भात त्या संपत्तीच्या रकमेवर प्रश्न उपस्थित केला: “३८ व्या वर्षी ११.५ कोटींची निव्वळ संपत्ती असणे ही अविश्वसनीय गोष्ट आहे. तेही पुण्यात… तिथल्या पगाराच्या आकड्यांनी सुखद धक्का दिला. त्यांचे वार्षिक उत्पन्न सांगणे शक्य आहे का? जेणेकरुन माझी स्वतःची आर्थिक स्थिती (जी कदाचित खूपच खराब आहे) त्या तुलनेत कुठे भरते, हे मला समजेल.”
इतरांनी त्या जोडप्याने मुले न होऊ देण्याचा घेतलेला निर्णय आणि भविष्यात त्यांचे आयुष्य कसे असेल, यावर लक्ष केंद्रित केले. “जेव्हा ते म्हातारे होतील, तेव्हा त्यांच्याशी बोलायला फक्त कुत्रेच असतील.”
Pune News : पुण्याची MH12 ओळख टिकणार? इंग्रजी अक्षरं संपत आली, प्रताप सरनाईकांनी पर्याय सांगितले, गडकरींशीही चर्चाआणखी एका युजरने प्रश्न उपस्थित केला की, नोकरी न करता पुढील चार दशके निभावून नेण्यासाठी त्यांची सध्याची आर्थिक स्थिती पुरेशी आहे का. तसेच त्यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाबद्दलही चिंता व्यक्त केली.
“पुढील ४० वर्षे काम न करता जगण्यासाठी सध्याचे आकडे समाधानकारक नाहीत; मालमत्तेचे वाटप आणि नियोजन यांत सुधारणा किंवा फेरबदल करण्याची गरज आहे.” असे एकाने म्हटले आहे.
अपत्यहीन असल्याबद्दलही प्रश्न
मुले न होऊ देण्याबद्दल त्या जोडप्याला कालांतराने पश्चाताप होऊ शकतो का; तसेच लवकर निवृत्त होण्याऐवजी त्यांनी काम करत राहावे, असा युक्तिवाद काही जणांनी केला.
“निवृत्तीनंतर ते काय करणार आहेत? मुले नसल्याबद्दल पश्चाताप? त्याबद्दल विचार करण्यासाठी जितका कमी वेळ असेल तितके चांगले. त्यामुळे त्यांनी कठोर परिश्रम करत राहावे, जेणेकरुन त्यांना त्यांच्या त्या भयंकर निर्णयाचा विचार करावा लागणार नाही.” असेही एका युजरने म्हटले आहे.
Crime News : हे घर माझं आहे… तिशीतील दाम्पत्याचा गूढ मृत्यू, मध्यरात्री दीड वाजता आईला पाठवलेल्या व्हॉईस मेसेजमुळे ट्विस्टही चर्चा ‘FIRE’ (Financial Independence, Retire Early – आर्थिक स्वातंत्र्य आणि लवकर निवृत्ती) या दृष्टिकोनाभोवती फिरणाऱ्या एका व्यापक प्रश्नावर प्रकाशझोत टाकते. या दृष्टिकोनामध्ये लोक इतकी संपत्ती आणि गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न जमा करण्याचे ध्येय ठेवतात की, ज्यामुळे पगारी नोकरी करणे ऐच्छिक बनते.

