पण, अलीकडे चंद्रशेखरन यांच्या घोषणेमुळे गेल्या काही महिन्यांतील अनिश्चिततेत भर पडली असून टाटा सन्स व टाटा ट्रस्ट्सच्या संचालक मंडळांमधील अंतर्गत कलहामुळे निर्माण झालेल्या भूतकाळातील आठवणी ताज्या झाल्या आहेत.
एन. चंद्रशेखरन यांचा उत्तराधिकारी कोण?
अशा परिस्थतीत, आता चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यानंतर सर्वांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की टाटा सन्सचा नवीन बॉस कोण बनणार? चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2027 मध्ये संपणार असून यामुळे टाटा सन्सकडे या स्थित्यंतराचे नियोजन करण्यासाठी भरपूर वेळ असेल, पण टाटांचा नवा शोध इतकं सोपं काम नसेल. टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक टी. व्ही. नरेंद्रन सध्या संभावित उत्तराधिकाऱ्यांपैकी चर्चित नाव आहे.
टाटा सन्सच्या अध्यक्षांची निवड कशी होते?
टाटा सन्सच्या नियमांनुसार, पाच सदस्यीय समितीद्वारे अध्यक्षांची निवड केली जाते. यापैकी 3 सदस्य सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नामनिर्देशित केले जातात, तर एक सदस्य टाटा सन्सच्या संचालक मंडळातील असतो आणि पाचवा सदस्य संचालक मंडळाद्वारे स्वतंत्र सदस्य निवडला जातो. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार विश्वस्त सभा आयोजित करता येत नसल्याने, SRTT सध्या यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे, चंद्रशेखरन यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याच्या योजनेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
चंद्रशेखरन यांनी अचानक राजीनामा जाहीर केल्यावर टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष आणि दिवंगत रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा अंतरिम अध्यक्ष बनू शकतात. टाटा स्मूहाच्या धोरणानुसार नोव्हेंबरमध्ये टाटा समूहाच्या इतर कंपन्यांच्या संचालक मंडळातून निवृत्त होणार असून बिगर-कार्यकारी संचालकांसाठी निवृत्तीचे वय 70 वर्षे निश्चित केले आहे. पण, नोएल टाटा, ट्रस्टचे नामनिर्देशित सदस्य आहेत आणि निवृत्तीच्या वयाची अट ट्रस्टच्या नामनिर्देशित सदस्यांना लागू होत नसल्यामुळे टाटा सन्सचे संचालक म्हणून कायम राहतील.
चंद्रशेखरन यांच्यानंतर नरेंद्रन?
नोएल टाटांच्या जवळच्या लोकांच्या माहितीनुसार अद्याप काहीही निश्चित झाले नाही आणि अजूनही समूहात नेतृत्व बदलात नेतृत्व बदलाच्या हालचाली झालेल्या नाही. पण, नोएल टाटांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, भविष्यात नरेंद्रन नोएल यांच्या मुख्य टीमचा भाग असू शकतात, तर या दरम्यान RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी नरेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे.
एन चंद्रशेखरन यांची निवड कशी झालेली
ऑक्टोबर 2016 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्यासाठी कंपनीने 5 सदस्यांची निवड समिती स्थापन केलेली. या शोधप्रक्रियेदरम्यान रतन टाटांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेलेली.
त्यावेळी या समितीत रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, माजी मुत्सद्दी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश होता. अखेरीस समितीने एकमताने चंद्रशेखरन यांची शिफारस केली, जे त्यावेळी TCS चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होते. जानेवारी 2017 मध्ये टाटा सन्सच्या मंडळाने शिफारस स्वीकारली आणि त्यानंतर पुढील महिन्यात चंद्रशेखरन यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. 2017 मध्ये टाटांनी चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
मात्र, आता परिस्थितीत काहीशी बदलली आहे. मिस्त्रींना पदावरून पदावरून हटवल्यावर नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली, त्यामुळे उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू असताना रतन टाटांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केलेले. पण, आता याउलट चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यामुळे सध्याचा कार्यकाळ संपण्यापूर्वी उत्तराधिकारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समूहाला काही महिन्यांचा कालावधी मिळेल. अशा स्थितीत, टाटा सन्सला हंगामी अध्यक्षाची गरज न भासता थेट चंद्रशेखरन यांच्याकडून उत्तराधिकाऱ्याकडे सूत्रे सोपवली जाऊ शकतात.

