Headlines

शासकीय कार्यालयाबाहेर दंडात्मक कारवाई ; विनाहेल्मेट कर्मचाऱ्यांना ठोठावला दंड,१२ हजार रुपयांचा दंड वसूल


Chhatrapati Sambhajinagar News:वाहन चालकांनी विनाहेल्मेट वाहन चालवले तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. परंतू ही कारवाई आता थेट शासकीय कार्यालया समोर येऊन थबकली आहे. १२ शासकीय कार्यालयासमोर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर बारा हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर:शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा. हेल्मेट केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचविण्यासाठी नसून, स्वत:च्या मौल्यवान जीवनाच्या रक्षणासाठी आहे. हेल्मेट वापरण्याची शिस्त सर्वांना लागावी. यासाठी याची सुरूवात शासकीय कार्यालयांपासून सूरू करण्यात आली आहे. अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.

१२ शासकीय कार्यालयांसमोर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

शासकीय कार्यालयात विना हेल्मेट दुचाकीवरून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. शहरातील १२ शासकीय कार्यालयांसमोर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनाहेल्मेट दुचाकी वापरणाऱ्या वाहनचालकांना तीन लाख तीन हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे. बारा हजार रुपयांचा दंड वसूलही करण्यात आला आहे.

कारवाई सुरू

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिस विभागातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दुचाकी वापरताना हेल्मेट सक्तीने वापरण्याबाबत सूचना केली आहे. पोलिस विभागासह सर्व शासकीय कार्यालयांमध्येही दुचाकी वापरणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांनी हेल्मेट वापरावे. अशा सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनेच्या अनुषंगाने ११ ऑगस्ट रोजी वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील विविध भागातील शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट दुचाकी वापरणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई सुरू केली.

Maharashtra TimesVile Parle Fire : मरण डोळ्यासमोर तरी कर्तव्य विसरली नाही, फ्लॅटला आग, घरकाम करणाऱ्या अंकिताची चिमुकल्या अबीरसाठी धाव, दोघांचाही वेदनादायी अंत

३०३ अधिकारी कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई

या कारवाई अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जीएसटी भवन, आरोग्य संचालनालय, जीवन प्राधिकरण कार्यालय, पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालय, वन विभाग, ज्ञान वैज्ञानिक प्रयोगशाळा, शासकीय मेंढी पालन केंद्र तसेच इतर कार्यालयांसमोर विना हेल्मेट मोटारसायकलवरून कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या ३०३ अधिकारी कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तीन लाख तीन हजारांचा दंड ठोठविण्यात आला आहे.

Maharashtra TimesNagpur Accident : मित्राच्या बर्थडेला निघाले, स्पीड वाढवला अन् घात झाला, दोघा मित्रांचा करुण शेवट, कार चालकाचे वडील गोत्यात

पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांच्या पथकाची कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंगेश जगताप, रेखा लोंढे, पवन चौधरी यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांच्या पथकाने केली.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा