मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बँक ऑफ अमेरिका यांनी भारताच्या आर्थिक क्षेत्रात मोठी भागीदारी जाहीर केली आहे. बँक ऑफ अमेरिका अंबानींच्या Jio Financial Services Limited ची नॉन-बँक फायनान्शियल कंपनी जिओ क्रेडिट लिमिटेड या कर्ज देणाऱ्या उपकंपनीत मोठी गुंतवणूक करणार आहे. दरम्यान, जिओ लिमिटेडच्या या घोषणेनंतर आता देशांतर्गत शेअर बाजारातील या कंपनीच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष लागून असेल.
जिओ क्रेडिटमध्ये अमेरिकी बँकेचा हिस्सा
Jio Credit Limited मधील संयुक्त उपक्रमाबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला असून या अंतर्गत बँक ऑफ अमेरिका अंदाजे 1.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 18,268 कोटींची गुंतवणूक करेल आणि Jio क्रेडिटमध्ये जास्तीत जास्त 49.9 टक्के हिस्सा खरेदी करेल.
हा करार जिओ क्रेडिटचे मूल्य निव्वळ मूल्याच्या सुमारे 2.5 पट आहे, विशेष म्हणजे जिओ क्रेडिट सुरू होऊन आता फक्त दोन वर्षेच झाली असताना अंबानींच्या या कंपनीने BlackRock आणि Allianz नंतर तिसरी मोठी भागीदारी जाहीर केली आहे.
भारताचं तांदूळ नैसर्गिक नसल्याचे सांगत चीनकडून बंदी; 7 निर्यातदारांची नोंदणीच तात्पुरती रद्द
जिओ क्रेडिटमध्ये हिस्सा कसा खरेदी करणार?
भारतीय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार बँक ऑफ अमेरिकाची उपकंपनी NB होल्डिंग्ज प्रेफरेंशियल शेअर्स आणि वॉरंटद्वारे जिओ क्रेडिटमध्ये गुंतवणूक करेल. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात कंपनी सुमारे 6,613 कोटींची गुंतवणूक करून 4.29 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करेल ज्यामुळे NB होल्डिंग्सला Jio क्रेडिटमध्ये सुमारे 26.50 टक्के हिस्सा मिळेल.
त्यानंतर, बँक ऑफ अमेरिकाचे हेच युनिट सुमारे 11,655 हेच मध्ये 7.56 कोटी वॉरंटचे सब्स्क्रिप्शन घेईल आणि प्रत्येक वॉरंटचे 18 महिन्यांच्या आत एका इक्विटी शेअरमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. अशाप्रकारे, 25 टक्के रक्कम वॉरंट खरेदी करताना दिली जाईल, तर उर्वरित रक्कम शेअर्समध्ये रुपांतरित करताना भरावी लागेल तर, सर्व वॉरंटचे शेअर्समध्ये रूपांतर केल्यानंतर बँक ऑफ अमेरिकाचा हिस्सा 49.90% पर्यंत वाढेल.
टाटा सन्सच्या चेअरमनला पगार किती असतो? पाच वर्षात 650 कोटी रुपये कमवणाऱ्या एन चंद्रशेखरन यांचा पगार, बोनस सर्वांची माहितीBofA सोबत भागीदारीवर मुकेश अंबानींचे निवेदन
या भागीदारीदाबद्दल जारी केलेल्या निवेदनात मुकेश अंबानी म्हणाले की, “2047 पर्यंत भारताला विकसित अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणारी विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक अशी आर्थिक व्यवस्था असणे आवश्यक आहे.” तसेच उद्योगपती पुढे म्हणाले की “जिओ फायनान्शिअल तंत्रज्ञान आणि उत्तम प्रशासनाद्वारे भारतीयांसाठी आर्थिक सेवा सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून बँक ऑफ अमेरिकाचे जागतिक कौशल्य आणि जिओची डिजिटल पोहोच यांच्या संयोजनामुळे भारतात क्रेडिट ऍक्सेस वाढविण्यात मदत होईल.”
जिओ क्रेडिट करते काय?
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची NBFC कंपनी Jio Credit ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज पुरवते. कंपनीने अल्पावधीतच मोठा व्यवसाय उभारला आणि फक्त दोनच वर्षांत असेट मॅनेजमेंट 30,667 कोटींवर, म्हणजे सुमारे $3.2 अब्ज, पोहोचली. मात्र, जिओ क्रेडिट अद्याप असुरक्षित वैयक्तिक कर्ज आणि ग्राहक वित्त यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरलेली नाही. त्यानंतर आता कंपनीचे लक्ष डिजिटल पद्धतीने कर्ज देणे आणि भारतात क्रेडिट ऍक्सेस वाढवण्यावर आहे.
अशा परिस्थितीत, BofA सोबत या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट जिओ फायनान्शिअलची मजबूत डिजिटल पोहोच आणि बँक ऑफ अमेरिकाच्या जागतिक आर्थिक कौशल्यासह भारतातील स्थानिक बाजारपेठेतील समज यांची सांगड घालण्याचे आहे. दोन्ही कंपन्या डिजिटल वित्तीय सेवा, नवीन क्रेडिट उत्पादने, जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहकांना क्रेडिटची वाढती उपलब्धता यावर काम करतील.

