श्वेताला अर्जुन कुठे आहे याची खबर काढायची असते म्हणून तीमुद्दाम अस्मिताकडे जाते आणि म्हणते की अर्जुन सरांनी मला सांगितलेलं गौरीचा ताप उतरला की मला लगेच कळवा. आता तिचा ताप उतरला आहे त्यामुळे तुम्ही त्यांना फोन करून सांगाल का की तिचा ताप उतरलाय. अस्मिताला तिच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि ती अर्जुन ला फोन लावायला बघते पण अर्जुन कामात व्यस्त असल्यामुळे फोन उचलत नाही.
दुसऱ्या दिवशी कोर्टात सायली आणि सोनलला आणला जातं. सोबतच तो तोतया माणूस सुद्धा असतो त्याला बघून मधु भाऊ आणि कुसुम चिडतात. सोनलची आपल्याला इतक्यात बोलता येणार नाही असं सुद्धा पोलीस सायलीला सांगतात. यावेळी कोर्टात सचिन आणि राकेश वेश बदलून आलेले असतात जेणेकरून त्यांच्यावर कोणीही संशय घेणार नाही. सगळी तयारी झालेली असते. कोर्टात सगळेजण उपस्थित असतात पण नेमका अर्जुनचाच पत्ता नसतो त्यामुळे त्याची वाट पाहिली जात असते. सचिन प्रत्येक गोष्टीची अपडेट महिपत आणि प्रिया पर्यंत पोहोचवत असतो. विरोधी पक्षाचे वकील न्यायाधीशांना अर्जुनच्या हलगर्जीपणा बाबत सांगून त्याचे कान भरण्याचा प्रयत्न करत असतात. चैतन्य अर्जुन च्या वतीने कोर्टाची माफी मागतो.
Tharala Tar Mag दुसरीकडे प्रिया, श्वेता आणि महिपत फोनवर बोलत असतात. अर्जुन अजून कोर्टात पोहोचला नाही याची खबर त्यांना मिळालेली असते. पण प्रिया मात्र घाबरते कारण अर्जुन नक्की कुठे गेला आहे हे अजून त्यांना समजत नसतं. शिवाय महिपतला सुद्धा अर्जुनचा एक्सपिरीयन्स असतो त्यामुळे तो सुद्धा बोलतो की जेव्हा जेव्हा सुभेदार कोर्टात लेट पोहोचला आहे तेव्हा त्याने पुरावे शोधून आणलेलेच आहेत. महिपतच हे बोलणं ऐकून प्रिया चिडते आणि म्हणते की मी इथे सगळं तुरुंगात बसून मॅनेज करते आणि तुम्हाला साधं तिथे त्याच्या मागावर माणसं सुद्धा ठेवता येत नाहीत का? आपण एवढा बंदोबस्त करून सुद्धा त्या सचिनच्या माणसाच्या नाकावर टिचून अर्जून तिथून सटकला. प्रिया जास्तच बोलत असल्यामुळे महिपत तिच्यावर चिडतो. श्वेता त्या दोघांना शांत करत बोलते की सध्या आपल्याला अर्जुन कुठे आहे हे शोधणे गरजेचे आहे. प्रिया महिपतला सांगते की तुम्ही काहीही करा पण अर्जुन ला कोर्टात जणांपासून रोखा. महिपत सुद्धा लगेचच कामाला लागतो. ते तिघं फोनवर बोलत असतानाच अस्मिता गौरीला घेऊन पाठवू येते. प्रियाने ते फोनवर बघितलेलं असतं त्यामुळे ती लगेचच श्वेताला अलर्ट करून फोन कट करायला सांगते.
दुसरीकडे अर्जुन कोर्टात न पोहोचल्यामुळे न्यायाधीश सुनावणी पुढे ढकलला रस्ता पण तितक्यातच अर्जुन तिथे येतो. सुरुवातीला त्याला कोर्टाची माफी मागावी लागते पण नंतर कोर्ट सुनावणी सुरू करायला सांगतात. मग अर्जुन त्याचं ओपनिंग स्टेटमेंट देतो पण यावेळी तो असं काही बोलतो ज्यामुळे सगळ्यांना वाटतं की तो सायलीच्या विरोधात जाऊन बोलत आहे. सायली सुद्धा रडवेली होते. घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अर्जुन सायलीच्या विरोधात कसं काय बोलत आहे. विरोधी पक्षाचे वकील न्यायाधीशांना बोलतात की अर्जुन सुभेदार ने माझं काम सोपं केलं ते स्वतःच पुरावे सिद्ध झाल्याचं बोलत आहेत.
इथेच अर्जुन यु टर्न घेतो. तो बोलतो की मी काय बोललो हे नीट तुम्ही ऐकलं नाहीत. मी तुम्हाला एवढेच म्हणालो की हे पुरावे खरे आहेत कारण तुम्ही तसे सादर केले. तुम्ही ते सादर करताना हा विचार केला नाही की यामुळे एका निर्दोष महिलेवर अन्याय होईल. आता कुठे अर्जुन ची गाडी रुळावर येते हे पाहून सायली थोडी रिलॅक्स होते. अर्जुन कोर्टामध्ये अगदी निर्भीडपणे सांगतो की विरोधी पक्षाच्या वकिलांनी जे पुरावे सादर केले ते सर्व खोटे आहेत. त्यांनी हे पुरावे नीट तपासलेच नव्हते. अर्जुन ज्या प्रकारे स्टेटमेंट देत होता ते ऐकून विरोधी पक्षाच्या वकिलांना सुद्धा घाम फुटतो. सायली मात्र आशेने त्याच्याकडे पाहत असते.

