Headlines

लग्न अन् ब्लॅकमेलिंग; ‘नाटू नाटू’ गाण्याचा गायक राहुल सिप्लीगं आणि कुटुंबियांवर तरुणीचे गंभीर आरोप


Allegations on Singer Rahul Sipligunj:साऊथ इंडस्ट्रीतून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘नाटू नाटू’ गाण्याचा गायक राहुल सिप्लीगंजवर गंभीर आरोप करण्यात आलेत.

Rahul Sipligun:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: ऑस्करविजेत्या ‘आरआरआर’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘नाटू नाटू’ गाण्याचा गायक आणि ‘बिग बॉस तेलुगू ३’ चा विजेता राहुल सिप्लीगंज सध्या चर्चेत आला आहे. लग्न आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात एफआयआर नोंदवल्यामुळं तो चर्चेत आला आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर राहुलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली असून, हे ‘सत्याच्या खूप जवळ’ असल्याचं, पण सत्य नसल्याचं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (MVP पोलिस ठाणे) इथं एका २५ वर्षीय महिलेनं तक्रार दाखल केली आहे. लग्नाचं आमिष आणि फसवणूक केल्याची ही तक्रार आहे. पीडित महिलेनं दाखल केलेल्या तक्रारी नुसार, जुलै २०२५ मध्ये तिची ओळख ‘कर्पुरापू राहुल रेड्डी’ नावाच्या व्यक्तीशी एका ऑनलाइन डेटिंग ॲपद्वारे झाली होती. त्यानंराहुल सिप्लीगंजचा नातेवाईक असल्याचं सांगून लग्नाचे आमिष दाखवलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुढं लग्नास नकार दिल्यानंतर खाजगी फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी देण्यात आली.

Maharashtra TimesOhh My Dog BTS Story:फुटपाथवरचा ‘ब्रुनो’ कसा झाला बॉलिवूड सिनेमातला हिरो, सुपरस्टार नागार्जुन यांच्याकडून भेटीचं आमंत्रण, भन्नाट आहे ‘ओह माय डॉग’ची पडद्यामागची गोष्ट

राहुल सिप्लीगंजवर आरोप

महिलेच्या तक्रारीनुसार, राहुल सिप्लीगंज आणि त्याच्या काही नातेवाईकांनी तिला धमकावलं तसंच एका व्हिडिओमध्ये वक्तव्य नोंदवण्यासाठी जबरदस्ती केली. याप्रकरणी पोलिसांनी राहुल सिप्लीगंज, त्याची पत्नी आणि कर्पुरापू राहुल रेड्डीयांच्यासह १६ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या पुढील तपासासाठी महिला पोलिस ठाण्याकडं वर्ग करण्यात आलं आहे.

राहुल सिप्लीगंजची सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर राहुल सिप्लीगंजनं इन्स्टाग्रामवर एका यूट्यूब व्हिडिओच्या थंबनेलचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्या थंबनेलवर तेलुगू भाषेतील एक प्रसिद्ध म्हण लिहिली होती: ऊरुलो पेल्ली की कुक्कला हडाविडी अंते इदे एमो” (अर्थात: गावात लग्न सुरू आहे आणि कुत्रे उगाचच गोंधळ घालत आहेत.) राहुलनं काय म्हटलं? हा स्क्रीनशॉट शेअर करत राहुलने लिहिलें की, “आजच्या बातम्या पाहून आनंद झाला. हे आतापर्यंतचे सर्वात उत्तम थंबनेल आहे, कारण ते सत्याच्या खूप जवळ आहे. मी हे माझ्या बाजूनं आहे असं म्हणत नाहीये, पण हे सत्याच्या अगदी जवळ आहे. तसंच, या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी लवकरच एक विस्तृत व्हिडिओ शेअर करणार असल्याचंही राहुलनं स्पष्ट केलं आहे.

Maharashtra TimesKomal Rani Swarnkar: एअरपोर्टवर गोविंदासोबत स्पॉट झालेली कोमल राणी स्वर्णकार आहे तरी कोण? गोविंदा आणि तिच्या वयात इतक्या वर्षांचं अंतर
विशाखापट्टणम पोलिस (ACP सीएच आंबेडकर) या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपांची सत्यता तपासली जात आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा