Headlines

एअरपोर्टवर गोविंदासोबत स्पॉट झालेली कोमल राणी स्वर्णकार आहे तरी कोण? गोविंदा आणि तिच्या वयात इतक्या वर्षांचं अंतर


मुंबई: बॉलिवूडचा ‘हीरो नंबर १’ अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण या सिनेमापेक्षा या सिनेमातील अभिनेत्रीचीच चर्चा जास्त होताना दिसतेय. खरं तर गेल्या एक दोन वर्षापासून गोविंदा या ना त्या कारणामुळं चर्चेत असतो. ही चर्चा त्याच्या कामाची, सिनेमांची नसते तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची, घटस्फोटाची आणि अफेअर्सची असते.

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं अनेकदा तो एका तरुण अभिनेत्रीला डेट करत असल्याचा दावा केला होता. पण यावर त्यानं कधीही भाष्य केलं होतं. आता काही दिवसांपूर्वी तो एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला, यानंतर चर्चेचा उधाण आलं. ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न नेटकरी विचारू लागले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोविंदाचं नाव नवोदित अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत जोडलं जात असून, दोघांच्या कथित नात्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलंय मुंबई विमानतळावर गोविंदा आणि कोमल एकत्र स्पॉट झाल्यानंतर सुनीतानंही यावर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली होती.

Maharashtra TimesTMKOC FDA Promo: तुकाराम मुंढे इफेक्ट! ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्येही FDA चा छापा, माधवी आत्माराम भीडेला धक्का, प्रोमो व्हायरल

नक्की कोण आहे कोमल राणी स्वर्णकार ?

तब्बल ७ वर्षांनंतर गोविंदा ‘रूपा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटाच्या संदर्भात आणि प्रवासादरम्यान गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहण्यात आलं. कोमल राणी स्वर्णकार (तिला राणी स्वर्णकार या नावानंही ओळखलं जाते) ही मुळची उत्तर प्रदेशातील रहिवासी असून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गोविंदाच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. ‘रूपा’ शिवाय गोविंदाच्या ‘दुनियादारी’ या प्रोजेक्टमध्येही कोमल झळकणार असल्याचं म्हटले जात आहे.

कोमल ही ग्लॅमर विश्वातील नवोदित अभिनेत्री असून तिच्या शिक्षणाबद्दल किंवा कुटुंबाबद्दल फारशी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Maharashtra TimesSunita Ahuja: विनाशकाले विपरीत बुद्धिः, काय चाललंय त्यालाच माहिती, गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एअरपोर्टवर एकत्र; सुनीता आहुजाचा संताप

गोविंदापेक्षा किती वर्षांनी लहान आहे कोमल?

असं म्हटलं जात होतं की, गोविंदा तिच्या पेक्षा २० वर्षांनी लहान तरुणाला डेट करत आहे. पण कोमल स्‍वर्णकार हिचा जन्म १९६९ मध्ये झाला आहे. त्यामुळं तिचं सध्याचं वय हे ५६ इतकं आहे. तिच्या आणि गोविंदाच्या वयात फक्त ६ वर्षांचं अंतर आहे.

मुंबई विमानतळावरील व्हिडीओमुळे चर्चांना उधाण अन् सुनीताची प्रतिक्रिया

या भेटीनंतर नेटिझन्स आणि माध्यमांमध्ये त्यांच्या अफेअरच्या अफवा सुरू झाल्या. गोविंदा आणि कोमल यांच्या एकत्र दिसण्यावर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं माध्यमांशी बोलताना संतप्त आणि सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “विनाशकाले विपरीत बुद्धी” असं म्हणत तिनं गोविंदावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण ऐकली आहे ना? त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, म्हणूनच तो हे सगळे करत आहे, सुनीता आहुजा म्हणाली. दरम्यान, गोविंदा किंवा अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार या दोघांपैकी कोणीही अद्याप या अफेअरच्या चर्चांवर अधिकृत वक्तव्य किंवा दुजोरा दिलेला नाही.

‘रुपा’बद्दल…

‘रूपा’ चित्रपटात गोविंदा केवळ मुख्य भूमिकेतच दिसणार नाही, तर तो स्वतः या चित्रपटाची निर्मितीही करत आहे. या सिनेमात याशिवाय महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील अनेक नव्या कलाकारांना या चित्रपटात संधी देण्यात आली आहे. गोविंदानं पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ‘रूपा’ हा चित्रपट विशेषतः तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून बनवला जात आहे. आजची तरुण पिढी अनेक अपेक्षा घेऊन प्रवास सुरू करते, पण अनेकदा भ्रम किंवा सोशल मीडियाच्या दुनियेत भरकटते. तरुणांनी आत्मविश्वास ठेवावा, आपली स्वप्ने पूर्ण करावीत आणि स्वतःच्या मुळांशी जोडलेले राहावे, असा संदेश या चित्रपटातून दे

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत