Headlines

China Suspend License Of 7 Indian Rice Exporter ;


चीनकडून भारतातील 7 तांदूळ निर्यातदारांच्या रजिस्ट्रेशनवर अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या साती निर्यातदारांचे रजिस्ट्रेशन निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. चीन भारतीय बाजारपेठेतून गैर-बासमती तांदळाची आयात करतो. जर चीनने भारतातून येणाऱ्या तांदळाच्या व्यापारात अशाच अडचणी तयार केल्या तर याचा खरंच भारतातातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होईल का? जाणून घ्या.

China Suspend Registration Of Indian Rice Exporters
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भारताला डिवचण्याचा प्रयत्न चीनकडून वेळोवेळी केला जातो. भारत एक कृषिप्रधान देश आहे. आता चीनने चक्क मर्यादाच ओलांडली आहे. त्याने देशाच्या कृषिप्रधानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. भारताकडून तांदळाची मोठी निर्यात केली जाते. देशाच्या तांदूळ बाजारपेठेत चीन इतर ग्राहकांपैकी एक आहे. अशामध्ये चीनने 7 भारतीय तांदूळ निर्यातदारांचे रजिस्ट्रेशन निलंबित केले आहे, याचा भारतातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर काही प्रमाणात परिणाम जाणवू शकतो. रजिस्ट्रेशन निलंबित केल्यामुळे भारत-चीन तांदूळ व्यापारात मोठा अडथळा दिसून येत आहे. चीनने याआधीदेखील भारत-चीन तांदूळ बाजारपेठांमध्ये अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत त्यामुळे हे काही पहिल्यांदा घडून आलेले नाही.

या सगळ्याचा भारतातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर परिणाम काय?

चीनने भारतातील 7 तांदूळ निर्यातदारांचे रजिस्ट्रेशन निलंबित केले आहे. याचा भारतातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर काही अंशी परिणाम जाणवू शकतो. भारतातील तांदळाला आखाती देशातून फार मोठी मागणी आहे. सौदी अरब, इराक, इराण तसेच युनायटेड अरब एमिरेट्स (UAE) या देशांमधून भारतीय तांदूळ मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. भारतीय बासमती तांदळाची मोठी निर्यात आखाती देशांमध्ये होते. तर बेनिन, बांग्लादेश तसेच टोगो या देशांमध्ये भारतातील नॉन-बासमती तांदळाची मोठी निर्यात होते. या देशांच्या तुलनेत चीन भारताकडून फार कमी प्रमाणात तांदूळ खरेदी करतो. त्यामुळे भारतातील भातशेती शेतकऱ्यांचे चीनमुळे फार असे नुकसान होईल असे नाही. भारत 140 देशांतून जास्त देशांना तांदूळ निर्यात करणारा देश आहे.

चीनचा नेमका आरोप काय आहे?

चीन भारताकडून नॉन-बासमती तांदूळ खरेदी करतो. चीनचा असा आरोप आहे की त्यांना भारतातून येणाऱ्या तांदळाच्या काही खेपांमध्ये GMO आढळून आला आहे. GMO म्हणजे जेनेटिकली मोडीफाईड ओर्गानिज्म. एकंदरीत, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पिकांमध्ये बदल करण्यात आल्यास त्याला GMO म्हंटले जाते. चीनने भारतातून आयात होणाऱ्या तांदळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच त्यांचे म्हणणे आहे की भारतातुन आयात होणाऱ्या तांदळावर GMO प्रक्रिया करण्यात आली आहे. याच कारणाने त्यांनी भारतातील 7 तांदूळ निर्यातदारांचे रजिस्ट्रेशन निलंबित केले आहे.

भारताने चीनचे आरोप फेटाळून लावले

भारताने चीनच्या आरोपांना तथ्य नसल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की ‘चीनकडे असणारा तांदळाचा साठा आता आवश्यक तितका भरल्यामुळे त्यांनी भारतीय निर्यातदारांसंबंधित असे दावे केले आहेत.’

Maharashtra Timesटाटा सन्सच्या चेअरमनला पगार किती असतो? पाच वर्षात 650 कोटी रुपये कमवणाऱ्या एन चंद्रशेखरन यांचा पगार, बोनस सर्वांची माहितीयाआधी चीनने मे 2026 मध्ये 3 भारतीय तांदूळ निर्यातदारांच्या रजिस्ट्रेशनवर अडथळे आणले होते. त्यानंतर या निर्यातदारांनी APEDA ला हस्तक्षेप करण्याची मागणी केली. निर्यातदारांच्या विनंतीनुसार निर्यातीसाठी तयार तांदूळ APEDA च्या लॅब्समध्ये परीक्षणासाठी पाठवण्यात येऊ लागले. GMO नसणाऱ्या तांदळालाच पुढे निर्यातीसाठी पाठवण्यात येऊ लागले.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा