Headlines

रागाच्याभरात चुकीचे वाक्य बोलून गेलो, कथित ऑडिओ क्लिपवर शिवसेना शहरप्रमुखाचा खुलासा


राज्य परिवहन मंडळाकडून दापोलीत येथील ई-बसेसचे व्यवस्थापन करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची ड्युटी अचानक रद्द केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. याच आरोपातून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपवर शिवसेनेच्या शहरप्रमुखाने स्पष्टीकरण दिलं आहे.

Dapoli
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : दापोली एसटी डेपो आगार काही वादग्रस्त घटनांमुळे याआधी चर्चेत आलं आहे. त्यानंतर आता राज्य परिवहन महामंडळाकडून दापोली येथे चालवणाऱ्या जाणाऱ्या ई-बसेसच्या व्यवस्थापन करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या ड्युटी अचानक रद्द करण्यात येत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी व्यवस्थापनातील एका कर्मचाऱ्याला फोन करुन कथित धमकी दिल्याचा आरोप करण्या येत आहे.

संबंधित कथित ऑडिओ क्लिपवर आता शिवसेनेचे शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “होय, मी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी भूमिका घेतली आणि ते मी योग्यच केले. आम्ही शिवसैनिक आहोत. कोणावरही होत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

22 जणांची ड्युटी रद्द केल्याचा दावा

“आम्ही शिवसैनिक आहोत स्थानिकांवर अन्याय झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. ई-बसेसचे व्यवस्थापन करणाऱ्या मोरया इंटरपाईजेसच्या दापोली येथील व्यवस्थापनाने एकूण 22 जणांच्या ड्युटी कॅन्सल केल्याचे प्रकार घडले आहेत. लावण्यात आलेल्या ड्युटी परस्पर रद्द करण्याचे कारण काय? जाणीवपूर्वक ड्युटी परस्पर रद्द केल्या जात आहेत. चार जणांच्या ड्युटी शुक्रवारी कॅन्सल केल्याने याची विचारणा करण्यासाठी आपण शुक्रवारी सायंकाळी उशिरा व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्याला कॉल केला होता”, असं प्रसाद रेळेकर यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या शहरप्रमुखाचे स्पष्टीकरण

“कर्मचाऱ्यांची ड्युटी रद्द का करता? यावर कोणतेही समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून मिळाले नाही आणि म्हणूनच माझा पारा चढला. मी रागाच्या भरात एखादे चुकीचे वाक्य बोलून गेलो. मात्र माझा उद्देश किंवा हेतू तसा नव्हता”, असं स्पष्टीकरण शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी दिले आहे

प्रसादर रेळकर यांचा व्यवस्थापकांवर घणाघात

“ई-बसेसचे व्यवस्थापन सांभाळणारे दापोली डेपोचे व्यवस्थापक भालेराव यांचा फोन स्विच ऑफ आला आणि ते दापोली वरून मुंबईला निघून गेले. त्यांच्याकडूनही या कर्मचाऱ्यांच्या ड्युटी रद्द करण्याचे कारण मला समजलं नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी मला ई-बसेस व्यवस्थापन करणारे पुण्याला असतात त्या रोहित शिंदे यांचा मला फोन आला की, आपण बसून चर्चा करून हा प्रश्न सोडवू. आमचीही भूमिका तीच आहे. मात्र येथील व्यवस्थापक हे कोणाच्या इशाऱ्यावर चालतात?” असा सवाल त्यांनी केला.

‘परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे तक्रार करणार’

“आज रविवारीही येथील ड्युटी कॅन्सल करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याला फोन आला की, तू मला भेटायला ये. त्याशिवाय तुझी ड्युटी लागणार नाही आणि ही मनमानी आम्ही चालू देणार नाही. या सगळ्या संदर्भात आपण परिवहनमंत्र्यांकडे तक्रार करणार”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

स्थानिक कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायविरोधात आपण परिवहन महामंडळाच्या ई-बसेसचे व्यवस्थापन पाहणाऱ्या व्यवस्थापनाला जाब विचारला. यामध्ये आपण कोणतीही चूक केली नसल्याचेही त्यांनी सांगितलं. मोरया एजन्सी नक्की चालवतोय कोण? असा आजही प्रश्न आहे. ई-बसेस व्यवस्थापन पाहणाऱ्या दापोली कार्यालयातील व्यवस्थापनाचा हा मुजोरपणा आम्ही सहन करणार नाही, असाही इशाराही प्रसाद रेळेकर यांनी दिला आहे.

ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त

दरम्यान, या प्रकरणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेनेच्या शहरप्रमुखांवर अशा स्वरूपाची धमकी देणे म्हणजे ही सत्तेची नशा असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खुलासा करावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल क्लिप प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून शिवसेना शहरप्रमुखाच्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंग कॉल प्रकरणी ठाकरे शिवसेनेकडून निषेध करण्यात आला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा