Nanded Rahulnagar Son Killed Mother Over Petty Dispute then Ends his Own Life; पोटच्या लेकरानं आईला संपवलं, बॉडीजवळ बसून माऊलीच्या फोटोला स्क्रूड्राईव्हर टोचत राहिला अन् काही क्षणांत मृत्यूला कवटाळलं!
Nanded Rahulnagar Son Killed Mother Over Petty Dispute then Ends his Own Life; पोटच्या लेकरानं आईला संपवलं, बॉडीजवळ बसून माऊलीच्या फोटोला स्क्रूड्राईव्हर टोचत राहिला अन् काही क्षणांत मृत्यूला कवटाळलं!
Nanded Son Killed Mother : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
आईची हत्या केल्यानंतर मुलाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : जन्मदात्या आईचा मुलाने निर्घृणपणे हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि मन हेलावून लावणारी घटना नांदेड शहरातील राहुलनगरमध्ये काल शनिवारी घडली. हत्येनंतर आरोपी मुलगा अर्धातास आईच्या फोटोला स्क्रूड्राईव्हर मारत राहिला. भारती चौथरे (वय 50) आई आणि प्रतिक चौथरे (वय 26) असं मयत आणि आरोपीचं नाव आहे. जन्मदात्या आईची मुलानेच निर्घृणपणे हत्या केल्यानं या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
प्रतिक चौथरे हा तरोडा भागातील राहुलनगरमध्ये आपल्या आईसोबत राहत होता. त्याचे वडील बालाजी चौथरे हे सीआरपीएफमध्ये कार्यरत असून चेन्नई येथे कार्यरत आहेत. तर बहीण ही पुणे येथे शिक्षण घेत आहे. काल शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रतिकचा त्याच्या आईसोबत वाद झाल्याची माहिती आहे. याच वादातून त्याने आईला मारहाण करत डोक्यात रॉड घातला. रक्तबंभाळ झालेल्या भारती चौथरे या आईचा जागेवर मृत्यू झाला.
Pune Crime: आई गावी गेलीय; आधी माऊलीला संपवलं, नंतर बॉडी तशीच ठेवून घराला कुलूप ठोकलं; अखेर फुटलं पुण्यातील घटनेचं बिंग! घटनेनंतर आरोपी मुलगा खोलीतील मयत आईच्या फोटोला अर्धातास स्क्रूड्राईव्हर मारत राहिला. घरातून महिलेचा आवाज आल्यानं नागरिक जमा झाले. घराबाहेर लोक जमा झाल्यानं तो घाबरला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन त्यानेही गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा मुख्य दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला, यावेळी भारती चौथले ह्या रक्तबंभाळ अवस्थेत आढळून आल्या तर प्रतिकचा मृतदेह हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मागील काही दिवसापासून तो मानसिक तणावात होता आणि नांदेड शहरातील एका डॉक्टरकडे त्याचे उपचार सुरु होते अशी माहिती समोर आली आहे.
रेल्वेत नोकरीही लागलेली
दरम्यान, प्रतिक हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. अनेक मेडल त्याच्या खोलीत आढळून आले. काही महिन्यांपूर्वी तो रेल्वेची प्रतीक्षा उत्तीर्ण झाला होता. जॉइनिंग लेटर देखील आल्याची माहिती आहे. मात्र, जन्मदात्या आईची निर्घृणपणे हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली. आईचा जीव घेण्यामागचं नेमकं कारण काय? मुलानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? या घटनेमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत.
नांदेडमध्ये काल शनिवारी हत्येच्या तीन घटना घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पहिली घटना बाफना परिसरात घडली. कचरा वेचणाऱ्यांमध्ये वाद होऊन एकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास टोळीतील चार ते पाच जणांनी दुचाकीवर जात असलेल्या 26 वर्षीय इंदरसिंघ बावरी या तरुणाची चाकू भोसकून हत्या केली. शहरालगत असलेल्या वाजवा पेट्रोल पंप वाजेगाव रोड पेट्रोल पंपावर ही घटना घडली. जुन्या वादातून हत्याकांड झाल्याची चर्चा आहे. आरोपी हे केबी गँगचे होते. तिसरी घटना राहूलनगरमध्ये घडली. मुलानेच आईची हत्या करून स्वतः आत्महत्या केली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा