Pakistan Turkey Saudi Defence Deal: करारावेळी तुर्कीयेचे अध्यक्ष रेसेप तय्यब एर्दोगान, सौदीचे युवराज महंमद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते.

मक्का येथील अल-सफा पॅलेसमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान आणि तुर्कीयेचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’वर स्वाक्षऱ्या केल्या. संयुक्त संरक्षणासाठी आयोजित मक्का अल-मुकर्रमा शिखर परिषदे दरम्यान हा करार झाला.
Iran News: ते खरंच सर्वोच्च नेते होते का? अंधाऱ्या कारमध्ये खामेनींची भेट; पण इराणच्या राष्ट्रपतींनाच शंका‘कोणत्याही आक्रमक कृतीविरुद्ध सामूहिक प्रतिबंधक क्षमता बळकट करणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे. करारातील तरतुदींनुसार, तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल,’ असे संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संरक्षण सहकार्याच्या सर्व क्षेत्रांना अधिक बळकटी देण्याची तरतूदही या करारात करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष तांबडा समुद्र आणि बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीसह विविध आघाड्यांवर विस्तारत असताना, आखाती देशांपुढे प्रादेशिक सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, या कराराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Thailand School Firing: आजी-आजोबांना संपवून आठवीतील मुलगा शाळेत; बेछूट गोळीबारात सहा ठार, शिक्षक, विद्यार्थ्यांची पळापळ‘सामूहिक सुरक्षा अधिक सक्षम करण्याची; तसेच प्रदेशात आणि त्यापलीकडेही शांतता, सुरक्षा व स्थैर्याला चालना देण्याची तिन्ही देशांची सामायिक बांधिलकी या करारातून अधोरेखित होते,’ असे संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारताचे बारीक लक्ष
‘आम्ही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या संदर्भातील अद्ययावत माहिती योग्य वेळी देऊ,’ असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

