Headlines

पर्यटनातून महिलांसाठी वर्क फ्रॉम होम संधी


सावंतवाडी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून महिलांना वर्क फ्रॉम होमची नवी संकल्पना निश्चितच फलदायी ठरेल, असा विश्वास सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या सक्षम स्त्री फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण, सबलीकरण तसेच महिलांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक यांनी, “सावंतवाडी शहरातील महिलांसाठी घरबसल्या वर्क फ्रॉम होमची संकल्पना रुजविण्याचा हा शुभारंभ आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले, सक्षम स्त्री फाउंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक, माय ट्रॅव्हलाईट सखी इनिशिएटिव्हचे संचालक श्री. नितीन येरुणकर, श्री. निलेश उपाध्याय, सौ. रिद्धी कांबळी, उपाध्यक्षा नगरसेविका सौ. सुनीता पेडणेकर, सचिव सौ. मेघा राणे-गावडे, खजिनदार नगरसेविका सौ. दुलारी रांगणेकर तसेच सहसचिव सौ. अंकिता बांदेकर-नेवगी उपस्थित होत्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत