Headlines

आचरा पोलीसठाणा सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी संजय कातीवले


आचरा प्रतिनिधी : आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांची सागरी सुरक्षा शाखा ओरोस येथे बदली झाल्याने रिक्त जागी विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आपण सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी दिली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, माजी सरपंच डॉ प्रमोद कोळंबकर, अनिल करंजे, पांडुरंग वायंगणकर, सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर,अभय भोसले, उदय घाडी, जगदीश पांगे, प्रफुल्ल घाडी, शैलेश मुणगेकर आदी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत