Headlines

कॅप्टन बदलला, बॉलिंग आणि फिल्डिंगही फसली! लंकेविरुद्ध सरावात टीम इंडिया ढेपाळली, सकाळपासून काय घडलं?


Ind Vs Sl Test Practice Match : १५ ऑगस्टपासून श्रीलंका विरुद्ध भारताची कसोटी मालिका सुरु होते आहे. त्यापूर्वी खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात भारताला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं?

Shubman Gill IND vs SL
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टीम इंडियाला श्रीलंका दौऱ्यात सुरुवातीलाच धक्का बसला आहे. हा धक्का काही साधारण नाही. तर कर्णधार शुभमन गिलसंदर्भातला आहे. होय, लंका विरुद्ध भारत सीरिजआधी आज ७ ऑगस्टपासून खेळवला जाणारा सराव सामन्याबद्दल मोठी अपडेट समोर आलाी आहे. या सामन्यातून आता कर्णधार गिल बाहेर पडला आहे. तो या सामन्यात टीमचं नेतृत्व करत नाहीये, तर त्याच्याजागेवर केएल राहुलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामागचं कारण म्हणजे काल नेट प्रॅक्टिसदरम्यान उजव्या हाताच्या बोटाला त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कोणतीही घाई न करता मॅनेजमेंटने त्याला पहिल्या दिवशी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान हा सामना कोलंबोतल्या नॉनडिस्क्रिप्टस क्रिकेट क्लब मैदानावर खेळला जात आहे. सामन्याआधी नाणेफेक पार पडली. यामध्ये श्रीलंकेने बाजी मारली आहे. टीम इंडियाला त्यांनी गोलंदाजी देत पहिल्या दिवशी फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार बदलला

कर्णधार गिलला झालेली दुखापत किती चिंताजनक आहे? याबाबत अधिक माहिती समोर आलेली नसली तरी मात्र प्रॅक्टिसदरम्यान फटका लागल्यानेच ही दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्याच्यावर आता वैद्यकिय टीम लक्ष ठेवून आहे. पहिल्या दिवशीतरी तो खेळणार नाही आहे.

Maharashtra TimesIND W vs PAK W : भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! आशियाई क्रिकेट परिषदेने वेळापत्रक जाहीर केलं

असं असलं तरीही कर्णधार गिलच्या जागेवर आता टीम इंडियाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज आणि विकेटकिपर केएल राहुल करत आहे. राहुललाही नेतृत्वाची सवय आहे. त्यामुळे काही जास्त चिंतेची बाब नाही. केएल राहुलने यापूर्वीही टीमचं नेतृत्व केलं आहे. सराव सामना हा नीट पार पडावा यासाठी केएल योग्य पर्याय असल्याने व्यवस्थापनाने त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे.

आतापर्यंत श्रीलंकेचा स्कोर किती?

दरम्यान, आतापर्यंत श्रीलंकेने २४६/४ धावा बनवल्या आहेत. भारताला ११० धावांची प्रतिक्षा केल्यानंतर पहिले विकेट मिळवता आहे. दरम्यान, हे विकेटरी रनआऊटच्या रुपाने मिळाले आहे. तर दुसरे विकेट हे ४१ व्या ओव्हरमध्ये मिळाले. टी ब्रेकअगोदर भारताने आणखी दोन विकेट घेतले. श्रीलंकेची सध्या फलंदाजी सुरु आहे. तथापि सराव सामन्यात प्लेइंग ११ जाहीर करत नसतात, निवडलेले सगळे ११ फलंदाज, ११ गोलंदाज यामध्ये खेळत असतात.

Maharashtra TimesWTC Final Scenario : पाकिस्तान जवळपास आऊट, पण भारत अजूनही WTCची फायनल गाठू शकतो, नेमकं कसं? वाचा संपूर्ण समीकरण

टीमची निराशाजनक कामगिरी

दरम्यान, पहिल्या दिवशी भारतासाठी थोडीशी चिंताजनक घडामोडही समोर आली आहे. कारण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला ९ षटकं एकही विकेट काढता आली नाही. त्याने ३० धावा दिल्या. प्रसिद्ध कृष्णाने ५ षटकांमध्ये २७ धावा दिल्या. गुरनूरने ४ षटकांमध्ये २५ धावा दिल्या. फिरकीपटूंनीही काही चांगली कामगिरी केली नाही. रवींद्र जडेजाने ८ मध्ये ४०, कुलदीपने ५मध्ये २३ तर मानव सुथारने ५ मध्ये १४ धावा दिल्या पण त्यालाही काही विकेट मिळवण्यात यश मिळाले नाही. पहिल्या दिवशी टीमची क्षेत्ररक्षण कामगिरीही अपयशी राहिली आहे. रवींदू रसंथाचा झेल कर्णधार केएल राहुलकडून सुटला. त्याने प्रयत्न पूर्ण केला होता पण त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर लगेच सिली पॉइंटवर देवदत्त पडिक्कलने रसंथाचा आणखी एक झेल सोडला.

Maharashtra TimesVirat Kohli : विराटची ‘वृंदावन’ भक्ती, अनुष्कामुळे कोहली बदलला? विरुष्काच्या श्रद्धेवर प्रश्न, मोहम्मद शमीचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, काय म्हणाला?

टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये कोण?

शुभमन गिलला पहिल्या दिवसासाठी विश्रांती देण्यात आली आहे पण भारतीय संघाच्या सामन्याच्या गटात त्याचा समावेश आहे. भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, KL राहुल, ऋषभ पंत यांच्यासह अनुभवी आणि युवा खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा