Shiv Sena SC Hearing : सिब्बलांची न्यायमूर्तींच्या सवालांना थेट उत्तरं, शिंदेंच्या अडचणी वाढणार? – shiv sena party symbol case advocate kapil sibal argument 6 august
Shiv Sena SC Hearing : सिब्बलांची न्यायमूर्तींच्या सवालांना थेट उत्तरं, शिंदेंच्या अडचणी वाढणार? – shiv sena party symbol case advocate kapil sibal argument 6 august
#shivsenasymbolcase #shivsena #supremecourthearing #uddhavthackeray #eknathshinde #kapilsibalनिवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे मूळ नाव ‘शिवसेना’ तसेच ‘धनुष्य-बाण’ हे अधिकृत चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ६ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या एका महत्त्वाच्या कायदेशीर संघर्षात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर आणि कार्यपद्धतीवर थेट सवाल उपस्थित केले. तर दुसरीकडे, सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जोयमाला बागची यांनी विचारलेल्या काही तीक्ष्ण प्रश्नांमुळे या खटल्याला अत्यंत रंजक वळण मिळाले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ६ ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालयात काय काय घडलं, कपिल सिब्बल यांनी कोणते मुख्य कायदेशीर युक्तिवाद केले आणि न्यायमूर्ती बागची यांच्या प्रश्नांना त्यांनी कशी उत्तरे दिली आणि ठाकरेंची बाजू कशी लावून धरली.. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा..