Headlines

SIR प्रक्रियेदरम्यान भाजपकडून मतदारांची वर्गवारी, रोहित पवारांचे पुरावे दाखवत गंभीर आरोप – rohit pawar alleges bjp running parallel voter check during sir bjp counters claim


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांपूर्वी एसआयआरच्या माध्यमातून अनेक लोकांची नावे कशी वगळण्यात आली, त्यानंतर तिथे भारतीय जनता पक्ष सत्तेत आला आणि असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातही घडतोय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपवर एक अत्यंत गंभीर आणि तितकाच धक्कादायक आरोप केला आहे. रोहित पवारांचा असा दावा आहे की, महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण म्हणजेच SIR Special Intensive Revision मोहिमेच्या नावाखाली भाजप विरोधी मतदारांची नावे मतदार यादीतून गायब करण्याचा एक मोठा कट रचला जातोय. महाराष्ट्रात निवडणुका या २०२९ मध्ये होणार आहेत पण सध्या झालेली आंदोलन पाहता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण गेल्याचं दिसून आलं. त्यातच रोहित पवारांनी केलेले आरोपांमुळे लोकशाहीला धोका निर्माण होतोय की काय हा सवाल उपस्थित होतोय. पण नक्की काय आहे हा संपूर्ण प्रकार? बीएलए अॅप किंवा पोर्टलच्या माध्यमातून नक्की काय चाललंय? रोहित पवारांनी कोणते ३ मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यावर भाजपने काय उत्तर दिलंय? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत