Headlines

Solapur | सोलापुरात महिला संतापल्या, पृथ्वीराज चव्हाणांवर घसरल्या, नेमकं काय घडलं? – solapur women critisized congress



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#solapur #indiragandhi #sunetrapawar #ncp #ajitpawar #harshwardhansapkal #congressराज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया या भाषेत टीका केल्या नंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. सोलापुरातील विधवा महिला संघटनांनी याची दखल घेत, पृथ्वीराज चव्हाण यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना, अनेक फाइली वर सह्या केल्या नव्हत्या, त्यावेळी लकवा मारलेला मुख्यमंत्री अशी उपमा जनतेने दिली होती. एका विधवेचा अपमान महाराष्ट्र राज्य सहन करणार नाही , पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही असा इशारा वाव (wow)विधवा महिला संघटनेने दिला आहे. गुंगी गुडिया हा शब्द काँग्रेसला अधिक प्रिय आहे , कारण स्वर्गीय इंदिरा गांधींना विरोधकांनी म्हटलं होतं. त्यामुळं काँग्रेसने हा शब्द आठवणीत ठेवलं आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत