Raigad 18 years of physical and mental torture in mahad husband faces serious allegations of 10 abortions; महिलेचा तब्बल १८ वर्षे छळ, १० वेळा जबरदस्तीने गर्भपात; पतीविरुद्ध दिली शारीरिक छळाचा तक्रार
Raigad 18 years of physical and mental torture in mahad husband faces serious allegations of 10 abortions; महिलेचा तब्बल १८ वर्षे छळ, १० वेळा जबरदस्तीने गर्भपात; पतीविरुद्ध दिली शारीरिक छळाचा तक्रार
अमुलकुमार जैन, रायगड: लग्न म्हणजे सहजीवन आणि विश्वासाचे नाते मानले जाते. परंतु महाड शहरात या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड झाली आहे. विवाहित महिलेचा तब्बल १८ वर्षे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ करत तिच्या इच्छेविरुद्ध दबाव टाकून तब्बल १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तिच्या पतीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर महाड (शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी यांचा विवाह ९ ऑक्टोबर २००८ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच आरोपीने पत्नीचा छळ सुरू केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. माहेरून काहीच आणलं नसल्याचं कारण देत तिचा सातत्याने मानसिक छळ करण्यात आला. पीडित महिला नोकरी करत असल्याने तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. एवढेच नव्हे, तर घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांचाही आर्थिक भार तिच्यावर टाकण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, आरोपीने विवाहबाह्य संबंध ठेवत पत्नीला चाकूचा धाक दाखवून घरातील भांडी, झाडू, कंबरेचा बेल्ट तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपटून गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देत तिला भीतीच्या छायेत जगण्यास भाग पाडल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे २००९ ते २०२२ या कालावधीत विविध कारणे सांगून पत्नीवर दबाव टाकत तिच्या संमतीशिवाय तब्बल १० वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी महाड(शहर) पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १२३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ८५, ८९, ३५१(२), ११५(२) व ३५२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या राऊत करीत असून तक्रारीतील प्रत्येक आरोपाची सखोल चौकशी सुरू आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा