Headlines

usa cricketer akhilesh reddy banned for 8 years by icc ; आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कलंक! ICC कडून अखिलेश रेड्डीवर 8 वर्षांची बंदी; मॅच फिक्सिंगची सगळी स्टोरी समोर


अमेरिकेच्या २६ वर्षांच्या क्रिकेटपटूने भ्रष्टाचार विरोधी संहितेचे नियम मोडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आयसीसीने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. ही कारवाई कोणती आहे. त्यानंतर हा खेळाडू कोण आहे, याबद्दल जाणून घ्या.

akhilesh reddy banned for 8 years by icc
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या संघाकडून खेळणारा २६ वर्षांचा क्रिकेटपटू बोदुगुम अखिलेश रेड्डी याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC नं ८ वर्षांची बंदी घातली आहे. मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करणे, दुसऱ्या खेळाडूला त्यासाठी दबावात आणणे आणि मोबाईलमधील मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट करणे या कारणांमुळे ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या बंदीमुळे आता त्याला पुढील ८ वर्षे कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण UAE मध्ये झालेल्या अबू धाबी T10 टूर्नामेंट २०२५ मधील आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘एस्पिन स्टालियन्स’ संघाच्या पहिल्या सामन्याआधी अखिलेश रेड्डीने हॉटेलच्या खोलीत आपल्याच संघातील एका सहकाऱ्याला गाठले. गोलंदाजी करताना मुद्दाम जास्त धावा दे, असा फिक्सिंगचा प्रस्ताव त्याने या सहकाऱ्यासमोर ठेवला.

फिक्सिंगचा प्रस्ताव नाकारला अन् भांडाफोड झाला

ज्या सहकाऱ्याला रेड्डीने फिक्सिंगची ऑफर दिली होती, त्याने ती लगेच नाकारली. एवढेच नाही तर त्याने या प्रकाराची तक्रार थेट आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे केली. तक्रार केल्याचे समजताच अखिलेश रेड्डीने घाबरून आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सॲप मेसेज आणि कॉल हिस्ट्री डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण तपासादरम्यान त्याची ही चलाखी उघडकीस आली.

Maharashtra TimesJasprit Bumrah News : दुखापतीनं टीम इंडियाचा ‘यॉर्कर किंग’ बुमराह पुन्हा बाहेर, गेल्या 5 वर्षांत मोठ्या मालिकांना मुकला, काय होत्या अडचणी?

रेड्डीवर मुख्य तीन आरोपांखाली कारवाई

आयसीसीने औपचारिक सुनावणीनंतर रेड्डीला दोषी ठरवले आहे. सामना प्रभावित करणे किंवा फिक्स करण्याचा प्रयत्न करणे, इतर खेळाडूला भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त करणे आणि तपासादरम्यान मेसेज डिलीट करून अडथळा निर्माण करणे या तीन मुख्य नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबर २०२५ पासून त्याच्यावर ही ८ वर्षांची बंदी लागू मानली जाईल.

अखिलेश रेड्डीची कारकीर्द

अखिलेश रेड्डीने केमन आयलंड्सविरुद्धच्या ‘नॉर्थ अमेरिका T20 कप’मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने अमेरिकेसाठी आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून त्यात १ बळी टिपला आहे. मात्र, या एका चुकीमुळे त्याची क्रिकेट कारकीर्द आता पूर्णपणे धोक्यात आली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा