Headlines

Ahilyanagar Maliwada Bus Stop Chikki Packet Larvae Found Tukaram Mundhe FDA; चिक्कीचं पॅकेट घेतलं, उघडताच धक्कादायक दृश्य, जिवंत अळ्या हातावर; तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?


Ahilyanagar Chikki Larvae : तुकाराम मुंढेंनी राज्यात कारवाईचा धडाका सुरु केलाय. त्याचदरम्यान, आता अहिल्यानगरमध्ये चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Ahilyanagar Chikki Packet larvae
अहिल्यानगर माळीवाडा चिक्कीमध्ये अळ्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पॅकेट उघडताच…

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली. मात्र, पॅकेट उघडताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या फिरताना दिसून आल्या. हा प्रकार पाहून ग्राहक हादरला. याबाबत हातगाडी चालकाला विचारणा केली असता, संबंधित चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानातून आणल्याचं त्याने सांगितलं.
Maharashtra TimesSangli Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत संपवलं, बॉडी लोखंडी पोत्यात लपवली; आरोपीला मृत्यूदंड, सांगली प्रकरणात ऐतिहासिक निर्णय

बुरशी लागलेले, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थाची खुलेआम विक्री

या घटनेमुळे शहरात विक्रीस असलेल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुदतबाह्य, बुरशी लागलेले तसेच निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खुलेआम विकले जात असल्याची चर्चा असून, संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी आणि प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अशा प्रकारचे निकृष्ट आणि दूषित खाद्यपदार्थ लहान मुले, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे संबंधित दुकान, पुरवठादार आणि दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
Maharashtra TimesKonkan Railway: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवात नव्या गाडीचा श्रीगणेशा, कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार?

दूध भेसळीच्या आरोपांनंतर वळसे पाटलांची मोठी घोषणा

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. एफडीएच्या धाडीत एका नामांकित कंपनीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. एफडीएच्या या कारवाईनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला असून आंबेगावचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेसळखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करत या प्रकरणात माझा काहीही संबंध आढळल्यास मी तात्काळ सामाजिक जीवनातून निवृत्ती घेण्यास तयार आहे, अशी भूमिका मांडली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा