Headlines

Dilip walse patil major revelation over milk adulteration allegations; मी एक मिनिटही थांबणार नाही, निवृत्त होईल; दूध भेसळीच्या आरोपांनंतर वळसे पाटलांची मोठी घोषणा


पुणे: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध धाडसत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने धाड टाकत दूध भेसळ करणाऱ्यांना दणका दिला होता. एफडीएच्या धाडीत एका नामांकित कंपनीत भेसळयुक्त दूध आढळल्याचे समोर आले होते. एफडीएच्या या कारवाईनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला असून आंबेगावचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेसळखोरांना पाठिशी घातल्याचा आरोप त्यांच्या राजकीय विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा करत या प्रकरणात माझा काहीही संबंध आढळल्यास मी तात्काळ सामाजिक जीवनातून निवृत्ती घेण्यास तयार आहे, अशी भूमिका मांडली आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांपासून FDA मार्फत सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही विघ्नसंतोषी राजकीय विरोधकांकडून जाणीवपूर्वक माझे नाव या प्रकरणाशी जोडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या आरोपांमध्ये कसलंही तथ्य नाही. भेसळ करणारी व्यक्ती, कंपनी किंवा संस्था कोणतीही असो, अशा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंधित यंत्रणांनी कायद्यानुसार निष्पक्ष कारवाई करावी, हीच माझी पहिल्या दिवसापासून भूमिका आहे,” असं वळसे यांनी स्पष्ट केलं आहे.

“…तर निवृत्त होणार”

दूध भेसळ प्रकरणात माझा कोणताही संबंध असल्याचं कोणी सिद्ध केल्यास मी एक मिनिटही न घेता तत्काळ सार्वजनिक जीवनातून निवृत्त होण्यास तयार आहे. मात्र, खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून बदनामी करणाऱ्यांविरोधात यापुढे फौजदारी कारवाईसह अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल,” असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, “आंबेगाव-शिरूर विधानसभेसह महाराष्ट्रातील जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. सत्य हेच माझे सामर्थ्य असून अंतिम विजय सत्याचाच होईल, हा मला विश्वास आहे,” असंही ते म्हणाले.

देवदत्त निकमांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट

दिलीप वळसे पाटील यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देवदत्त निकम यांनी काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेत आंबेगाव तालुक्यातील दूध भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “दूध भेसळ माफियांवर कठोरातील कठोर कारवाई करा. तसंच या प्रकरणातील १३ फरार आरोपींना तात्काळ अटक करा. भेसळयुक्त दूध स्वीकारणाऱ्या प्रकल्पांवरही कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका निकम यांनी मांडली होती.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत