Headlines

Raj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप – raj thackeray claims rs 18 cr donation theft at mumbai shree siddhivinayak temple annually


Raj Thackeray On Siddhivinayak Donation Theft: मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

siddhivinayak temple
राज ठाकरे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होते. ही चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडण्यातही आले आहे. मात्र या प्रकरणाची पाळेमुळे वरपर्यंत पोहोचली आहेत, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मनविसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केला. ‘हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरे. सरकारवर विश्वास ठेवता येत नव्हता, आता तर मंदिरावरदेखील विश्वास ठेवता येत नाही. मग रस्त्यावर उद्रेक होणारच’, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा २०वा वर्धापनदिन शनिवारी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे, पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या संदर्भातील चौकशी करण्यासंदर्भात मंदिराच्या विश्वस्तांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले पत्र त्यांनी वाचून दाखविले.

Maharashtra TimesCJP Protest: तुमचा कॅप्शन गेम खूपच कमजोर! CJP आंदोलनातील मराठमोळ्या तरुणीचा स्वॅग; भाजपला सणसणीत प्रत्युत्तर
अयोध्येतील राम मंदिराबाबत तेच झाले. आता हा सिद्धिविनायक मंदिरातील प्रकार त्याच मंदिरातील विश्वस्तांनी समोर आणला आहे. या विश्वस्तांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे हे पैसे चोरणारे कर्मचारी पकडण्यात आले. दर आठवड्याला दानपेटीतून ५० लाख रुपयांपर्यंत रक्कम गोळा व्हायची. मात्र चोरी पकडल्यानंतर हीच रक्कम दीड कोटी रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. यामुळे दर वर्षी १८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा विश्वस्तांनी पत्रात केला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Maharashtra TimesIndian Railway: कन्फर्म तिकिटांसाठी बनावट VIP मार्ग; लोकभवनाच्या खोट्या शिक्क्यांचा वापर, सूत्रधारासह 3 रेल्वे एजंट अटकेत
आंदोलक मुलांना पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या मनाने माफ केले आहे. मीदेखील त्यांच्याशी सहमत आहेच. कोणीही कोणाची आई काढू नये. परंतु त्याचसोबत गेली १२ वर्षे जे सोशल मीडियावर घाणेरड्या भाषेत ट्रोलिंग चालते, आणि ते भाजपचेच ट्रोलर्स चालवतात. त्याच्याबद्दल कोणी बोलणार आहे का, असा प्रश्न राज यांनी केला.

रियासह हर्षवर्धनचा गौरव
नीटसंदर्भातील मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या व्हॅनसमोर येणाऱ्या रिया अहिर आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या हर्षवर्धन कदम या दोघांचा या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Maharashtra TimesAmit Thackeray : तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले
चंद्रकांत पाटलांवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलनादरम्यान फेकण्यात आलेल्या दगडांवरील मुलांचे फिंगरप्रिंट्स पोलिसांनी गोळा केले असून, ते आधारकार्डशी जोडणार आहेत असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. केसाला तेल चोपडलं पण मात्र बुद्धी आली नाही. हे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्या प्रिंट्स आता ते आधारशी लिंक करणार आहेत. मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट्स पाहायचे आहेत असा टोला लगावला

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा