Headlines

Raksha Khadse: रक्षा खडसेंवर वादग्रस्त वक्तव्य; भाजप नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ, एकनाथ खडसे आक्रमक! – bjp girish mahajn and vijay chaudhary obscene remarks on raksha khadse audio clip viral


Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse: रक्षा खडसे यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.

eknath khadse raksha khadse
रक्षा खडसे(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यावर अश्लाघ्य टिपणी केल्याचा दावा करण्यात आला आहे.

रक्षा खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. या कथित ध्वनिफितीच्या सत्यतेबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, यामुळे महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, अन्य एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार हीना गावित यांच्यावरही आक्षेपार्ह टिपणी केल्याचे समजते.

कथित व्हायरल क्लिपमध्ये विजय चौधरी यांनी, रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात का कायम ठेवण्यात आले आहे, असा प्रश्नही कथित संभाषणात उपस्थित केल्याचे सांगितले जात आहे. रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करण्याचाही संवाद क्लिपमध्ये आहे, तर एकनाथ खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. कथित ऑडिओमध्ये गिरीश महाजन प्रतिक्रिया देताना ऐकू येत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

Rohini Khadse | भाजप आमदार संजय रावल यांची खडसे कुटुंबियांना शिवीगाळ, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

खडसेंचा कारवाईचा इशारा
आमदार एकनाथ खडसे यांनी संबंधित कथित ध्वनिफितीबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा दिला आहे. मी माझ्या वकिलांचा सल्ला घेत असून, या प्रकरणात लवकरच कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित क्लिप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे देणार असल्याचेही ते म्हणाले.
Maharashtra TimesNagpur News : क्रिकेटमध्ये करिअरचं स्वप्न अधुरं; 17 वर्षीय अदितीनं आयुष्याची दोर कापली, मागे सोडलेल्या चिठ्ठीत काय?
विजय चौधरींचा राजीनामा
धुळे : भाजपचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे. काही दिवसांपासून कथित क्लिप प्रसारित करून विरोधकांकडून पक्षाची आणि स्वत:ची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठीच राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामापत्रात चौधरी यांनी तेरा वर्षांपासून भाजपने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्याचा उल्लेख केला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा