ajinkya rahane retirement wife radhika shares parents emotional letter ; तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र
ajinkya rahane retirement wife radhika shares parents emotional letter ; तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र
Ajinkya Rahane Parents Emotional Letter: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर त्याच्या आई-वडिलांनी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनाला भिडणारे हे शब्द आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे अजिंक्यने आपल्या या निर्णयाची माहिती दिल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, अजिंक्यच्या या निर्णयावर त्याच्या पालकांची काय प्रतिक्रिया आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकर-रहाणे हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर अजिंक्यच्या आई-वडिलांनी त्याला लिहिलेले एक अत्यंत भावूक पत्र शेअर करून ही प्रतिक्रिया समोर आणली आहे.
राधिकाने या पत्रासोबत एक खास माहितीही जोडली आहे. तिने लिहिले आहे की, “३० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अजिंक्यने हातात बॅट घेत एका प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात केली होती. आज त्याच दिवशी तो खेळाचा निरोप घेत असताना, त्याच्या वडिलांनी प्रेम, अभिमान आणि आठवणींनी भरलेले हे पत्र लिहिले आहे. काही क्षण खरोखरच वर्तुळ पूर्ण करतात.”
अजिंक्यच्या आई-वडिलांनी पत्रात त्याच्या बालपणापासूनच्या खडतर प्रवासाला उजाळा दिला आहे. पत्रात त्यांनी लिहिले, “तुझा निवृत्तीचा फोन मन हेलावून गेला. १९९६-९७ मध्ये तुला डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावर दाखल केल्यापासूनचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. कोणत्याही सुविधा, साधने व पाठींबा नसतानाही तुझी इथपर्यंतची वाटचाल थक्क करणारी होती. अनेक चढ-उतार आले, पण तू खचला नाहीस, उलट तावून सुलाखून निघालास आणि देशाचे यशस्वी नेतृत्व केलेस.”
जगाने कौतुक केले नसले तरी तूच आमचा खरा हिरो!
पालकांनी पुढे लिहिले की, “आमच्या दृष्टीने तुझ्या यशापयशाच्या गोळाबेरजेपेक्षा तुझा साधेपणा, जमिनीवर असणे, खेळाशी व देशाशी असलेला प्रामाणिकपणा आणि तुझे निष्कलंक क्रिकेट हेच महत्त्वाचे आहे. जगाने जरी तुझे जास्त गोडवे गायले नसले तरीही तूच आमचा खरा हिरो आहेस.”
शेवटी हितचिंतक, प्रशिक्षक व सहकाऱ्यांचे ऋण कायम मनात ठेवण्याचा सल्ला देत, पालकांनी त्याला आयुष्याच्या दुसऱ्या पर्वासाठी ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. पालकांचे हे भावूक पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा