Woman Starts Dancing After Conductor Asks for Aadhaar Card in Karnataka Viral Video | आधारकार्ड मागताच महिलेच्या अंगात झाला देवीचा संचार? बसमधील व्हिडिओ व्हायरल, हालचाली पाहून प्रवासी घाबरले
Woman Starts Dancing After Conductor Asks for Aadhaar Card in Karnataka Viral Video | आधारकार्ड मागताच महिलेच्या अंगात झाला देवीचा संचार? बसमधील व्हिडिओ व्हायरल, हालचाली पाहून प्रवासी घाबरले
Viral Bus Video from Karnataka: कर्नाटकमधील एका बसमधील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आधारकार्ड मागितल्यानंतर तिच्या अंगात देवी आली. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रकारची चर्चा करत आहेत.
(फोटो सौजन्य – @newskarnataka/x.com)
आरती, भजन, गोंधळ किंवा जागरणादरम्यान काही महिलांच्या अंगात देवी आल्याचं सांगितलं जातं. असे प्रकार तुम्हीही यापूर्वी अनेकदा पाहिले असतील. वास्तविक, दैवी शक्ती शरीरात प्रवेश करते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. मात्र, जगभरातील अनेक जाती-धर्मांतील लोक धार्मिक श्रद्धेच्या आधारावर अशा घटना खऱ्या असल्याचं मानतात. असो, या विषयावर अनेक दशकांपासून वाद-विवाद सुरू आहेत. पण याच पार्श्वभूमीवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनं मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
बसमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या महिलेकडे कंडक्टरनं आधारकार्ड दाखवण्यास सांगितलं. पण आश्चर्य म्हणजे, ओळखपत्र दाखवण्याऐवजी ती महिला चित्रविचित्र पद्धतीनं नाचू लागली. काही लोकांचा दावा आहे की, ‘आधारकार्ड’ हा शब्द ऐकताच तिच्या अंगात देवीचा संचार झाला.
नेमकं घडलं काय?
हा व्हिडिओ @newskarnataka या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला बसमध्ये चित्रविचित्र हालचाली करताना दिसत आहे. कंडक्टरनं तिला आधारकार्ड दाखवण्यास सांगितल्यानंतर तिनं असे प्रकार करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तिच्या अंगात अचानक देवी का आली किंवा बसमध्ये तिच्यासोबत नेमकं काय घडलं, याबाबत कोणतीही ठोस अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नेटकरी काय म्हणताहेत?
नेटकरी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणत आहे, “ताई, अंगातली देवी गेल्यानंतर कंडक्टरला तिकिटाचे पैसे देऊन टाक.” तर काहींच्या मते, या महिलेला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. (फोटो सौजन्य – sonam_patil933official/Instagram)
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.
डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.
महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.
क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.… आणखी वाचा