Ryan ten Doeschate Marathi News : गौतम गंभीरचा जिगरी मित्र जो त्याच्यासोबतच भारताचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. मात्र बीसीसीआयने करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला, आता दुसऱ्या दिवशी डोशेट यांना ऑफर आली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली : आयर्लंड आणि इंग्लंडमधील टी-२० मालिकेतील दारुण पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. भारतीय क्रिकेट संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप यांचा करार न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच एक बातमी समोर आली आहे की डोशेट यांना दुसऱ्याच दिवशी पुढील नोकरीची ऑफर आली आहे. ही ऑफर डोशेट यांना केकेआरकडून आलीय. डोशेट यांच्याकडे केकेआरने ‘हेड ऑफ क्रिकेट स्ट्रैटेजी’ ही जबाबदारी देण्यात आली आहे.
रायन टेन डोशेट CPLमधील ट्रिनबागो नाइट राइडर्स, ILT20 मधील अबू धाबी नाइट राइडर्स आणि MLC मधील लॉस एंजिल्स नाइट राइडर्स या तीनही संघांसाठी ते असिस्टंट कोच म्हणूनही काम पाहतील. याबद्दल नाइट राइडर्स स्पोर्ट्सचे CEO वेंकी मैसूर म्हणाले, “डोशेट यांचे नाइट राइडर्स परिवारात पुन्हा एकदा स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. संघाबाबत सखोल जाण आणि फ्रँचायझी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा त्यांचा मोठा अनुभव या भूमिकेसाठी पूर्णपणे योग्य बनवतो” Gautam Gambhir : गौतम गंभीरला हटवले तर टीम इंडियाची कमान कोणाकडे? हेड कोचसाठी 4 दिग्गज रेसमध्ये, एक सर्वात पुढे डोशेट यांच्यासह असलेला करार १० जूनला संपला होता. टी. दिलीप यांची मुदतही ८ जूनला संपली होती. त्यांच्यासह असलेला करार न वाढवण्याचा निर्णय झाला आहे, असे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले. इंग्लंडमधील मालिकेनंतर डोशेट यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सैकिया यांनी स्पष्ट केले. S. Srikkanth : ‘रजत पाटीदारच्या तुलनेत तो काहीच नाही’; माजी खेळाडू एस. श्रीकांत टीममधील खेळाडूचं नाव घेत स्पष्टच बोलले ‘डोशेट यांचा सह असलेला करार जूनच्या सुरुवातीस संपला होता. त्यांना इंग्लंडविरुद्धची मालिका संपेपर्यंत थांबण्यास सांगितले होते. करार संपलेला असताना राजीनामा देण्याचा किंवा तो मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे सैकिया यांनी ठामपणे सांगितले. डोशेट आणि दिलीप यांच्याऐवजी आता केवळ शुभदीप घोष यांचीच नियुक्ती अपेक्षित आहे. IND vs SL : वयाच्या 33 व्या वर्षी टीम इंंडियामध्ये निवड झालेला सारांश जैन नेमका कोण? श्रीलंकेत गाजवलंय मैदान दरम्यान, रायन टेन डोशेट यांचा नाइट राइडर्ससोबतचा प्रवास पाहिला तर केकेआर २०११ मध्ये खेळाडू म्हणून सुरू झाला होता. ते २०१२ आणि २०१४ मधील केकेआरच्या आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचे सदस्य होते. त्यानंतर २०२२मध्ये ते प्रशिक्षक गटाचा महत्त्वाचा भाग बनले आणि २०२४ मध्ये संघाने तिसरे आयपीएलचे विजेतेपद जिंकले तेव्हाही ते संघासोबत होते.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा