Maharashtra State Film Awards : सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२५ चे चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव तसेच विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – महाराष्ट्र शासनाने चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते प्रसाद ओक, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विविध पुरस्कारांसाठी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करून चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं २०२५च्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्श हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असून अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओकला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जीची राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. Chinmayee Sumeet : ‘पक्षाप्रमाणेच निरर्थक गोष्टी करतायत, बेरोजगारी वाढवायची, मुलांचा आत्मसन्मान दुखवायचा’, कंगना रणौतवर चिन्मयी सुमीतचा संताप हृदयनाथ मंगेशकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘त्या फुलांच्या गंधकोषी’, ‘सागरा प्राण तळमळला’ यांसारखी अजरामर गाणी गायली आहेत. यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर यांना २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. Kangana Ranaut : ‘कित्येक लोकांसाठी मोदी देव आहेत, त्यांच्या भावना दुखावू नका’; कंगनाचं आणखी एक विधान चर्चेत दरम्यान, मराठी अभिनेता प्रसाद ओकनं आजवर अनेक गाजलेल्या सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. धर्मवीर आणि धर्मवीर २ या सिनेमांचं दिग्दर्शनही प्रसादनं केलं आहे. सलीम खान हे बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखन असून जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून त्यांनी गाजलेल्या सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. राखी मुखर्जीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘हम तुम’, ‘मर्दानी’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या सिनेमांमध्ये तिनं काम केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा