Headlines

Rules Change From 1 August 2026 Impact; LPG, क्रेडिट कार्ड ते आधार; 1 तारखेपासून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाशी संबंधित 8 महत्त्वाचे नियम बदलणार

Rules Change From 1 August 2026: दर महिन्याप्रमाणे 1 ऑगस्टपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती, आधार, क्रेडिट कार्ड आणि रेल्वे तिकीट नियमांचा समावेश आहे, ज्याचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो.

New Rules Change from 1st August 2206
1 ऑगस्ट 2026 पासून बदलणारे महत्त्वाचे नियम
Financial Changes: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशभरात अनेक आर्थिक बदल लागू होतात. 1 ऑगस्ट 2026 पासूनही असेच काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या-आमच्या सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. LPG सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याला सुधारित केल्या जातात. तसेच, रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट आणि आधार कार्ड यांसारख्या अनेक आर्थिक बदलांचा तुमच्या घरगुती बजेटवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, नवीन महिना सुरू होण्यापूर्वी तुम्ही या मोठ्या बदलांविषयी जागरूक असले पाहिजे.

एलपीजी सिलिंडरचे नवीन दर

एलपीजी सिलिंडरचे नवीन दर

महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या 14.2 आणि 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल आणि खर्चानुसार एलपीजीचा दर कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे, 1 ऑगस्ट रोजीच्या नवीन दरांवर सर्वांचे बारकाईने लक्ष असेल.

क्रेडिट कार्डचा नियम

क्रेडिट कार्डचा नियम

महिन्याच्या सुरुवातीला बँका एफडी आणि क्रेडिट कार्डच्या व्याजदर व इतर नियमांमध्ये बदल करू शकतात. यापैकी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स, सेवा शुल्क आणि इतर फीमध्येही बदल होऊ शकतो. तसेच रिझर्व्ह बँकेच्या एमपीसी बैठकीच्या परिणामी रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम एफडी आणि ईएमआय या दोन्हींवर होऊ शकतो.

रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगचा नियम

रेल्वे तात्काळ तिकीट बुकिंगचा नियम

1 ऑगस्ट 2026 पासून भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल जाहीर केला आहे. यानुसार आता रेल्वे स्टेशनवरील तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होताच टोकन दिले जातील, जेणेकरून आरक्षण काउंटरवरील गर्दी कमी होऊ शकेल. आतापर्यंत प्रवाशांना काउंटरवरून तत्काळ तिकीट बुक करायचे असल्यास आधी टोकन घ्यावे लागायचे आणि नंतर बुकिंगच्या काउंटरवर पुन्हा रांगेत राहावे लागायचे. पण, नव्या बदलामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि बुकिंग प्रक्रिया सोपी होईल.

CKYC नियम

CKYC नियम

फसवणूक रोखण्याच्या प्रयत्नात CKYC 2.0 नावाची प्रमुख ग्राहक ओळख प्रणाली ऑगस्टमध्ये सुरू केली जाणार आहे.

बँकेच्या नियमात बदल

बँकेच्या नियमात बदल

1 ऑगस्टपासून अनेक बँका सेवा शुल्कात सुधारणा करणार आहेत, यापैकी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांसाठी SMS अलर्ट शुल्कात बदल लागू करत आहे. आता यानुसार आता या बँकेच्या ग्राहकांना प्रत्येक SMS वर 30 पैसे शुल्क लागू होईल, ज्यावर मासिक मर्यादा असेल. याशिवाय ग्राहकांनी डेबिट कार्ड देखभाल शुल्क किंवा इतर सेवा शुल्कातील कोणत्याही बदलांसाठी बँकेकडे चौकशी केली पाहिजे.

उशिरा आयटीआर दाखल करताना दंड

उशिरा आयटीआर दाखल करताना दंड

31 जुलैपर्यंत सर्व नोकरदार करदात्यांना आयटीआर दाखल करणे अनिवार्य असून त्यानंतर 1 ऑगस्टपासून 1000 ते 5000 रुपयेपर्यंत विलंब शुल्क आकारले जाईल. तसेच ज्या करदात्यांना खात्याचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांनी ITR-3 आणि ITR-4 फॉर्म 31 ऑगस्ट या अंतिम तारखेपर्यंत दाखल करणे अनिवार्य आहे.

गृहकर्ज अन् ईएमआय

गृहकर्ज अन् ईएमआय

3 ऑगस्टपासून रिझर्व्ह बँकेची तीन दिवसीय MPC बैठक होणार असून या रेपो दरावर निर्णय घेतला जाईल. या निर्याणाचा गृहकर्ज, वाहन कर्ज, ईएमआय आणि मुदत ठेवींच्या व्याजदरांवर लक्षणीय परिणाम होईल.

जीएसटी नियम बदलणार

जीएसटी नियम बदलणार

1 ऑगस्टपासून होणाऱ्या अनेक आर्थिक बदलांमध्ये जीएसटी-संबंधित नियमही बदलणार आहेत, ज्याचा व्यवसाय, दुकाने किंवा व्यापाऱ्यांवर थेट परिणाम होईल. या नव्या बदलांनुसार ई-इनव्हॉइस आणि ई-वे बिल प्रणालीमध्ये सुधारणा करून अधिक आणखी पारदर्शक केली जातील. यामुळे बिल-टू-शिप-टू व्यवहारांसाठी शिप-टू-शिप GSTIN देणे अनिवार्य होईल. यामध्ये GSTIN, राज्य कोड आणि इतर माहितीचीही तपासणी केली जाईल. याशिवाय व्यवसायांना स्वेच्छेने ई-वे बिले निष्क्रिय करणेची शक्य होऊ शकेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा