Headlines

mohammed shami international comeback faces uncertainty bcci ; मोहम्मद शमीचं टीम इंडियातील कमबॅक आता अशक्य? BCCIकडून 15 पेसर्सची फौज तयार, पण त्यात ‘लाला’चे नावच नाही


Mohammed Shami Comeback News : मोहम्मद शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या भविष्यातील वेगवान गोलंदाजांच्या यादीत शमीचं नाव नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबाबत चर्चेला उधाण आलं आहे.

mohammed shami international comeback uncertainty
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या टीम इंडियापासून दूर आहे. एकेकाळी आपल्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक महत्त्वाचे सामने जिंकवून देणाऱ्या शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. त्यातच आता एका रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या भविष्यातील प्लॅनमध्ये शमीचं नाव नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील कमबॅकची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियातून बाहेर

मोहम्मद शमी भारतीय संघासोबत अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये दिसला होता. या स्पर्धेत तो भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्यानंतर त्याला टीम इंडियात पुनरागमन करता आलेलं नाही. दुखापतीमुळे काही काळ तो क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतल्यानंतरही त्याची भारतीय संघात निवड झाली नाही.

याच काळात शमीने बंगालकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना चांगली कामगिरी केली. आयपीएल २०२६मध्येही त्याचा सहभाग होता. मात्र, या कामगिरीनंतरही निवड समितीकडून त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला गेला नाही.

Maharashtra TimesSaransh Jain : 30 विकेट्स, 518 धावा, रणजी-दुलीप ट्रॉफीत धुमाकूळ; आता हरभजननेही सांगितली सारांश जैनची सर्वात मोठी ताकद, नेमकी काय?

१५ वेगवान गोलंदाजांची यादी, शमीचं नाव नाही?

‘स्पोर्टस्टार’च्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या निवड समितीने भविष्यातील नियोजनासाठी १५ वेगवान गोलंदाजांची यादी तयार केली आहे. या गोलंदाजांचा आगामी काळात भारतीय संघाच्या तीनही फॉरमॅटसाठी विचार केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या यादीत मोहम्मद शमीचं नाव नसल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

जर हा दावा खरा ठरला, तर शमीसाठी ही निश्चितच मोठी धक्कादायक बातमी असेल. कारण दुखापतीनंतर पुनरागमन करण्याची त्याची क्षमता यापूर्वी अनेकदा दिसून आली आहे. मात्र, भारतीय संघ सध्या युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचं चित्र आहे.

शमी निवृत्त होणार नाही, पण…

रिपोर्टनुसार, मोहम्मद शमीने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, बीसीसीआयच्या भविष्यातील प्लॅनमध्ये त्याचा समावेश नसल्याचा दावा करण्यात आला आहे. टीम मॅनेजमेंट आगामी काळात युवा वेगवान गोलंदाजांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

असं झाल्यास शमीला पुढील काळात प्रामुख्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतं. आयपीएल २०२७मध्येही तो मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

Maharashtra TimesGautam Gambhir : गौतम गंभीरला हटवले तर टीम इंडियाची कमान कोणाकडे? हेड कोचसाठी 4 दिग्गज रेसमध्ये, एक सर्वात पुढे

रहाणेनंतर आता शमीचंही तेच होणार?

मोहम्मद शमीची सध्याची परिस्थिती अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेसारखी असल्याची तुलना रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. रहाणेने अद्याप निवृत्ती घेतलेली नसली, तरी भारतीय संघाच्या भविष्यातील योजनांमध्ये त्याचा समावेश नसल्याचं चित्र आहे.

शमीच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे का, हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याने अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नसल्याने त्याच्यासाठी टीम इंडियात पुनरागमनाची दारं पूर्णपणे बंद झाली आहेत, असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र, बीसीसीआयच्या कथित भविष्यातील प्लॅनमध्ये त्याचं नाव नसल्याचा दावा खरा असल्यास, भारताच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजासाठी टीम इंडियात परतण्याचा मार्ग नक्कीच कठीण होऊ शकतो.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा