Headlines

Kritika Tulaskar : ‘कलाकार म्हणून स्विच ऑन स्विच ऑफ होणं गरजेचं’, कृतिका तुळसकरनं ओढले ताशेरे, म्हणाली, ‘माझ्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही’


Kritika Tulaskar : अपूर्वा नेमळेकरनं एका मुलाखतीमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ फेम कृतिका तुळसकरला अनप्रोफेशनल म्हटलेलं. यावर आता कृतिकानं प्रतिक्रिया दिली आहे.

Kritika Tulaskar On Apurva Nemlekar
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमध्ये शेवंताची भूमिका अपूर्वा नेमळेकरनं साकारली होती. पण, काही कारणानं अभिनेत्रीनं ही मालिका सोडली. अपूर्वानंतर अभिनेत्री कृतिका तुळसकरनं ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये शेवंताची भूमिका साकारली. आता ही मालिका संपून अनेक वर्ष झाली आहेत. मात्र, एका मुलाखतीमध्ये अपूर्वानं या मालिकेच्या निर्मात्यांबद्दल नाराजी व्यक्त केलेली आणि तिनं कृतिकाबद्दलही भाष्य केलं होतं. अपूर्वानं कृतिकाला ‘अनप्रोफेशनल’ म्हटलेलं. त्यावर कृतिकानं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सडेतोड उत्तरही दिलेलं. मात्र, आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये कृतिकानं यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

कृतिका तुळसकरचं सडेतोड उत्तर

मुलाखतीदरम्यान कृतिका तुळसकर म्हणाली की, ‘माझ्यामुळे या मालिकेचा टीआरपी आलाय किंवा माझ्यामुळे ही गोष्ट झाली, मी ही मालिका फेमस केली. जी भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर एवढी घेऊन ठेवलेली होती, ती भूमिका सोडून जाणं आणि ती दुसऱ्या कोणीतरी साकारणं याचं दुःख एखाद्याला कसं असू शकतं? ती मालिका संपली आणि मी तिथून जशी निघाले, त्या सेटवरून बाहेर पडले आणि त्या भुमिकेतूनही. मला असं वाटतं एक कलाकार म्हणून तुम्ही स्विच ऑन स्विच ऑफ होणं खूप जास्त गरजेचं आहे.’

Mata Carnival 2025: Satish Rajwade लक्ष्मी आहेत, त्यांच्यामुळे कलाकारांनी घेतलं नवीन घर, गाडी

कृतिका पुढे म्हणाली की, ‘व्हिडिओ करण्यामागचं फक्त एक छोटेसं कारण सांगते. मी असंच फेसबुक स्क्रोल करत होते आणि मला तो व्हिडिओ दिसला आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं बोललं गेलं होतं, ज्या व्यक्तीसोबत मी काहीच म्हणजे ब्र पण नाही, आम्ही फोनवर पण नाही बोललो, कधी आम्ही असं पास पण नाही झालो, एकमेकांचा वारा पण नाही लागला, तर ती व्यक्ती कसं म्हणू शकते की, मी अनप्रोफेशनल आहे.’
Maharashtra TimesRaja Chaudhary : ‘लग्नानंतरही एका अभिनेत्यासोबत तिचं अफेअर होतं’, श्वेता तिवारीबद्दल एक्स पती राजा चौधरीचा धक्कादायक दावा
‘माझ्याबद्दल प्रोफेशनलिझम किंवा अनप्रोफेशनलिझम, किंवा मी कशी आहे, याबद्दल बाहेर अफवा पसरवण्याचा हक्क कोणालाच नाहीये. ती व्यक्ती जोपर्यंत माझ्यासोबत काम नाही करत आहे तोपर्यंत. जरी काम केलं असेल त्या व्यक्तीने तरी ती व्यक्ती मला पैसे देत नाही आहे. म्हणजे त्या गोष्टीमुळे एखाद्याचं नुकसान नाही झालं तर एखाद्याला माझ्याबद्दल बोलण्याचा हक्कच येत नाही.’ असं कृतिकानं शेवटी सांगितलं. ‘अनफिल्टर्ड विथ श्रेयस’ या पॉडकास्टमध्ये कृतिका तुळसकर बोलत होती.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा