Nagpur Manishnagar Ashray Society Three Year Old Boy Crushed to Death Under Car; खेळताना अचानक कारखाली आला, बापाच्या डोळ्यासमोर लाडक्या चिमुकल्याचा अंत; अंगावर शहारे आणणारी घटना
Nagpur Manishnagar Ashray Society Three Year Old Boy Crushed to Death Under Car; खेळताना अचानक कारखाली आला, बापाच्या डोळ्यासमोर लाडक्या चिमुकल्याचा अंत; अंगावर शहारे आणणारी घटना
Nagpur Child Dies Under Car : नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका चिमुकल्याचा कारखाली आल्यानं अक्षरश: चिरडून मृत्यू झाला आहे.
आश्रय सोसायटी मुलाचा कारखाली मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : खेळता-खेळता अचानक रस्त्यावर आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा कारच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आश्रय सोसायटीमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. श्रीअंश पंकज आष्टणकर असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. तर हर्षद वाहाने (वय 28, रा. मानेवाडा) असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालकाचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीअंशचे वडील पंकज आष्टणकर यांचे मनीषनगर परिसरात ‘डेली निड्स’चे दुकान आहे. काल सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास श्रीअंश आपल्या वडिलांसोबत दुकानात आला होता. दुकानाच्या आवारात तो खेळत होता. खेळता-खेळता तो अचानक दुकानासमोरील सिमेंटच्या रस्त्यावर आला. त्याचवेळी एमएच 49 पीडब्ल्यू 6368 क्रमांकाची कार तिथे उभी होती. तितक्यात कारचालक कारमध्ये बसला आणि कारसमोर पुढे नेली. अचानक श्रीअंश कारच्या मागून धावत कारच्या अचानक समोर आला. कारचालकाला चिमुकला अचानक समोर आल्याचं लक्षात येईपर्यंत कार पुढे गेली आणि श्रीअंश कारच्या चाकाखाली आला. या भीषण अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी तायवाडे रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी त्याला मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आलं. Kolhapur News: कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडीत टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला!
श्रीअंशला मृत घोषित केलं
मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर श्रीअंशला मृत घोषित केलं. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून अपघाताचा तपास सुरू केला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी कारचालक हर्षद वाहाने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
माय-लेकाचा जागीच करुण अंत
भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निघोजे येथे रविवारी (२६ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. कंटेनरचालक सचिन यादव (रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माधव नारायण चोपलवाड (वय ३२, रा. खालुंब्रे, ता. खेड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. Weather Forecast: पावसाच्या तुटीने चिंता वाढलेली असतानाच आनंदाची बातमी; 48 तास अतिवृष्टीचा इशारा, विदर्भासाठी कसा आहे हवामान अंदाज? दक्षिण महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल प्रल्हाद चोपलवाड (वय २५), देवांश चोपलवाड (वय दीड वर्ष, दोघेही रा. नांदेड) आणि हरिदास उतलवाड दुचाकीवरून जात असताना कंटेनरने धडक दिली. त्यात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर हरिदास उतलवाड यांच्या कमरेवरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. निघोजे परिसरात भरधाव अवजड वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा